सोलापूरकरांनी २१५५ वाहनांची केली खरेदी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोलापूरकरांनी २१५५ वाहनांची खरेदी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहनखरेदीत वाढ झाली आहे. दुचाकी, चारचाकी, बस, टॅक्सी आणि मालवाहतूक वाहनांत वाढ झाली असून, नागरिकांनी सणाच्या दिवशी वाहनखरेदीस प्राधान्य दिले आहे. अशी माहिती परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली. गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दसरा, दिवाळी या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी वाहनखरेदीला नागरिकांकडून प्राधान्य दिले जाते. त्यासाठी सणाच्या काही दिवस अगोदर वाहनांची नोंदणी करून सणाच्या दिवशी वाहन घरी आणले जाते. या वर्षीदेखील गुढी पाडव्याला वाहनखरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वाहननोंदणी सुरू होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुचाकी, कारसह सर्वच वाहन खरेदीत वाढ झाली आहे. गुढीपाडव्यानिमित्त सोलापूरकरांनी खरेदी करण्यात आलेल्या वाहनांमध्ये मोटरसायकल १४१७, मोपेड २३, अनुकूलित वाहन २, मोटर कार ४०६, क्रेन २ ट्रॅक्टर ३ , मालवाहू वाहने ७९, ओमनी बस प्रायव्हेट युज १०, हार्वेस्टर ५, एक्झावेट, एन टी.३, ट्रेलर ७, जेसीबी १, तीन चाकी प्रवासी वाहतुकीची वाहने ३१, तीन चाकी वाहने मालवाहतुकीची १६ , जडमालवाहतुकीची वाहने १७, मोटार कॅब६, बस १ अशा २१५५ वाहनांची खरेदी करण्यात आली आहेत. या वाहन खरेदीच्या माध्यमातून राज्य परिवहन विभागाला दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा सहा कोटी ५८ लाख ५७ हजार १३७ रुपये कर मिळाला तर परिवहन वाहनांचा कर १९ लाख ३६ हजार ९२४ रुपये इतका महसूल मिळाला आहे. एका दिवसामध्ये २१५५ वाहनांची वाढ झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्याला इंधनही तेवढ्याच प्रमाणात वाढवावी लागणार आहे. दसरा, दिवाळी ,गुढीपाडवा, अक्षय तृतीया अशा शुभ मुहूर्तावरती सोलापूरकरांमधून वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते गरजेनुसार दररोज ही वाहनाची खरेदी सुरूच असते त्यामुळे वर्षाकाठी इंधनाची गरजही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
चौकट
वाहन वाढतात मात्र, पार्किंग घटत आहे. शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. संख्या वाढल्यामुळे पार्किंगचा मोठा प्रश्न सध्या निर्माण होत आहे भविष्यातील पार्किंग बाबत तर विचार न केलेलाच बरा. त्यामुळे वाहन खरेदी व मुदत संपलेल्या वाहनांच्या बाबतीत शासनाने गंभीर पाऊल उचलणे गरजेचे आहे. रस्ते अतिक्रमानामुळे कमी होत आहेत आणि रिकाम्या जागा बांधकामामुळे अटत आहेत मग वाहन पार्क करणार कुठे?
पवन माने - पाटील
0 Comments