Hot Posts

6/recent/ticker-posts

इंडियन ग्रीन बिल्डींग कार्पोरेशन नेस्ट प्लस या अंतर्गत सोलापुरातील इमारतीला नामांकन

 इंडियन ग्रीन बिल्डींग कार्पोरेशन नेस्ट प्लस या अंतर्गत सोलापुरातील इमारतीला नामांकन

 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आय.जी. बी.सी. नेस्ट प्लस म्हणजे इंडियन ग्रीन बिल्डिंग  या सेंट्रल गव्हर्मेंट  च्या संलग्न असलेल्या इमारतीच्या स्पर्धेत सहभागाकरिता सोलापूरच्या इफ्तेकार नदाफ यांच्या प्रोजेक्ट ला नामांकन मिळाले आहे . पॅन इंडिया अंतर्गत हा पहिला प्रोजेक्ट असून पश्चिम महाराष्ट्रासाठी हे अभिमानाचे क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाकडून ग्रीन बिल्डिंग साठी नामांक देण्यात येणाऱ्या आय.जी.बी. सी.नेस्ट प्लस या अंतर्गत संपूर्ण भारतातून सोलापूरला हा पहिला मान मिळालेला आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रोजेक्टसाठी ग्रेड ऑफ काँक्रीट टारगेट स्ट्रेंथ 26.6 इतकी होती. साइटवरील क्यूब स्ट्रेंथ 28.4 एम. पी. ए. इतकी मिळालेली आहे. शाश्वत काँक्रीटचे उत्कृष्ट उदाहरण नदाफ सर यांनी सोलापूरकर यांच्यासाठी उभे केलेले आहे. 

*आय.जी.बी.सी.नेस्ट प्लस या अंतर्गत इमारत गोल्ड रेटिंग यासाठी पात्र ठरत असल्याकारणाने वाढीव 5% इतका एफएसआय या बिल्डिंग साठी  मिळणार आहे. या बिल्डिंगचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग, टॉप सॉइल रिझर्वेशन, युज ऑफ ग्रीन प्रॉडक्ट, रिडक्शन इन कार्बन इमिशन यामुळे 20% पाण्याची सेविंग होते. या सर्व बाबीमुळे चांगले वास्तू उभे राहून वापरण्यास अगदी आरामदायी होते.*

हि इमारत मंत्री चंडक विहार होटगी रोड येथे असून सायन्स शिक्षक जुल्फेकार नदाफ हे या इमारतीचे मालक आहेत. आणि असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर चे माजी अध्यक्ष इत्तेकार नदाफ हे या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट मॅनेजमेट कन्सल्टंट आहेत. नामवंत स्ट्रक्चर डिझायनर यश. एस. साळे हे आहेत. आर्किटेक म्हणून सुफवान दंडोती हे काम पाहत आहेत. 

हे नामांकन मिळावे म्हणून इंजि. शितल राज सिंदखेडे एन आय बी एल चे इंजि. संगवे सर, इंजि. वैभव ढोणसळे, बाळासाहेब कुलकर्णी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

आय.जी. बी.सी. नेक्स्ट प्लस या नामांकनामुळे बांधकाम क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, सभासद यांनी इंजिनिअर इफ्तेकार नदाफ यांचे शुभेच्छा देऊन कौतुक केलेले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments