उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आ. राजू खरे यांनी केले जंगी स्वागत
पंढरपूर (कटुसत्य वृत्त):-
शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार स्वागत केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचा लोकार्पण सोहळा गुरूवारी सांगोला येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री शिंदे
यांचे हेलिकॉप्टरने दुपारी आगमन होताच मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आ. अॅड. शहाजीबापू पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, रमेश बारसकर आदींसह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. मुळचे कट्टर शिवसैनिक असलेले आ. राजू खरे हे
३४ वर्षाचे ऋणानुबंध
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार म्हणून आ. राजू खरे निवडून आलेले असले तरी शिवसेनेतील जिव्हाळा जराही कमी झाला नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. सांगोला येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला उघडपणे पोहोचून ऋणानुबंध जपले. ३४ वर्षे आपण शिवसैनिक राहिलेलो आहे. त्यामुळे ना. शिंदे यांच्याशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याचे आ. खरे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणूक निकालानंतर स्वतः राष्ट्रवादीचे आमदार असले तरी आ.खरे यांनी शिवसैनिक म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरूवातीलाच भेट घेऊन सत्कार केला. त्यावेळीही ना. शिंदे यांनी 'राजू आपला माणूस आहे' असे म्हणत आत्मियतेने मिठी मारली होती. दुसऱ्यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे गुरूवारी सोलापूर जिल्ह्यात येत असल्याने आ. खरे यांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली होती. त्यानुसार सांगोला येथील कार्यक्रमात पहिल्यांदा पोहोचत आ. खरे यांनी ना. शिंदे यांचे स्वागत केले. त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. ना. शिंदे यांनी आ.खरे यांच्या पाठीवर थाप टाकत वाटचालीस
शुभेच्छा दिल्या.
0 Comments