माळशिरस वनपरीक्षेत्र कार्यालय भ्रष्ट कारभाराच्या विळख्यात?
"वनपाल लडकत यांच्यावर कारवाई करण्याची होत आहे मागणी"
अकलूज (विलास गायकवाड):- माळशिरस वनपरिक्षेत्र कार्यालय, भ्रष्ट कारभाराच्या विळख्यात सापडले असून, वनपाल संजय लडकत यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा चर्चेचा विषय होऊ लागला आहे.
याचा सविस्तर वृत्तांत असा की,1982 पासून वनपाल संजय लडकत हे वनपरिक्षेत्र विभागात कार्यरत असल्याचे समजते.तर काही दिवसापूर्वी ते निवृत्त झाल्याचेही समजते. त्यांच्या कार्यकालाच्या निवृत्त होण्याच्या अगदी दोन-तीन महिने अगोदर, वनपाल संजय लडकत आणि एक अन्य कर्मचारी, दोघे मिळून, वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय माळशिरस या ठिकाणी, काही लोकांना लक्ष्मी दर्शन घडवत, असल्याचे निदर्शनास आले होते.याचा व्हिडिओ वनपरिक्षेत्राधिकारी आर. एस. आटोळे यांना पाठण्यातही आला होता.परंतु सदर प्रकरणाकडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कसलेच गांभीर्याने पाहिले नाही.वनपाल संजय लडकत व अन्य एक कर्मचारी, यांची चौकशी करण्यास अथवा त्यांच्यावरती कारवाई करण्यास टाळाटाळ करू लागले.
यामुळेच आले आटोळे आणि वन विभागाचे झाले वाटोळे असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.कारण ना खाउंगा,ना... खाणे दुंगा... या ब्रीद वाक्याचा अवमान असे भ्रष्ट कर्मचारी करू लागले आहेत.यामुळेच माळशिरस वनपरिक्षेत्र कार्यालय हे भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले आहे. अशा अघोरी कर्मचाऱ्यावर कोणाची मेहेरबानी आहे का? यांच्यावर कोण आणि कशी कारवाई करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत बलवान समजला जाणारा माळशिरस तालुका, नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धेच्या आणि चर्चेच्या झोतात असतो.जसे मोदी सरकार आले आहे तसे भ्रष्टाचाराचे अंतिम संस्कार झाले आहे, परंतु लडकत सारखे सरकारी कर्मचारी, अधिकारी येवढे निर्ढावलेले आहेत की,त्यांना भ्रष्ट कारभार करताना कसलीच भीती अथवा लाज राहिली नाही. असाच प्रकार माळशिरस वन विभागात घडताना दिसला आहे.
नातेपुते विभागात कार्यरत असलेले वनपाल संजय लडकत हे भ्रष्ट कारभारास खतपाणी घालत होते आणि त्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान होतो हे दुर्दैव म्हणावे लागेल असे सर्वसामान्य नागरिकांना वाटते, आणि त्यांच्या सन्मानास माळशिरस येथील कार्यरत असलेले वनपरिक्षेत्राधिकारीच कारणीभूत ठरले जाते,कारण उत्कृष्ट कामाचा अहवाल विभागातील वरिष्ठ अधिकारी देत असतात. याकडे आता अत्यंत गांभीर्याने उपवन संरक्षक अधिकाऱ्यांनी लक्ष घालून लडकत व त्यांच्या सन्मानाची शिफारस करणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
0 Comments