Hot Posts

6/recent/ticker-posts

निमगाव येथील मैदानात चटकदार निकाली कुस्त्या

 निमगाव येथील मैदानात चटकदार निकाली कुस्त्या



निमगाव : (कटुसत्य वृत्त):- निमगाव म. (ता. माळशिरस) येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुस्तींचे मैदान माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष प्रताप मगर यांनी कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. या मैदानाचे उद्घाटन संग्रामसिंह सेवा संस्थेचे चेअरमन विलास मगर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कुस्ती मैदानात सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव व अन्य जिल्ह्यातून छोट्या व नामांकित मल्लांनी निकाली कुस्त्या केल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. या कुस्ती मैदानात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, मल्लसम्राट रावसाहेब मगर, सरपंच सुभाष साठे हे प्रमुख उपस्थित होते. सर्व वस्ताद व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान प्रताप मगर, सतीश मगर यांनी केला. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी सतीश मगर, किरण मगर, प्रकाश मगर यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments