Hot Posts

6/recent/ticker-posts

विभागस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत माढयाचे किरण चव्हाण प्रथम

विभागस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत माढयाचे किरण चव्हाण प्रथम 



माढा (कटूसत्य वृत्त):- 
सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को. आॅप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विभागस्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत बार्शी येथील जनसेवा हायस्कूलचे व मूळचे माढयाचे असलेले किरण ज्ञानदेव चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

   सोलापूर येथील छत्रपती शिवाजी प्रशाला व नाईट काॅलेज झालेल्या या स्पर्धेत जनसेवा हायस्कूल बार्शीचे किरण चव्हाण (प्रथम), वाखरी ( ता. पंढरपूर)  येथील माध्यमिक आश्रमशाळेचे  सुजितकुमार कांबळे (द्वितीय), सोलापूर येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम उर्दू शाळेचे सातखेड अशपाक अ. बाबुलाल ( द्वितीय) आले आहेत. 

  
या स्पर्धा सोसायटीचे संचालक पप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. स्पर्धेसाठी कवी इंद्रजित घुले, सत्यवान दाडे, राजेश पवार यांनी काम पाहिले. श्नी. चव्हाण यांचे संस्थेचे सचिव डॉ. विलास गुंड, अध्यक्ष बाबासाहेब पोकळे, मुख्याध्यापिका शीला शिंदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.  स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments