Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर अर्बन बँकेला सहायक निबंधक योगिता मुरडे यांची भेट

 पंढरपूर अर्बन बँकेला सहायक निबंधक योगिता मुरडे यांची भेट




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  येथे सहायक निबंधक, सहकारी संस्था या पदावर नियुक्त झालेल्या प्रशासकीय अधिकारी योगिता मुरडे यांनी पंढरपूर अर्बन बँकेस भेट दिली. यावेळी चेअरमन सतीश मुळे व व्हाईस चेअरमन माधुरी जोशी यांच्या हस्ते बँकेची शतसुधा ही स्मरणिका भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बँकेचे संचालक अनिल अभंगराव, शांताराम कुलकर्णी, अमित मांगले, व्यंकटेश कौलवार,प्रभुलिंग भिंगे, गणेश शिंगण, गजेंद्र माने, हपीकेश उत्पात, अनंत कटप,सुनील डोंवे, संचालिका संगीता पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश वीरधे, राजेश आगवणे, गणेश हरिदास, पेंडाल हेद बँकेतील अधिकारी वर्ग तसेच सहायक निबंधक कार्यालयातील पी. वी. सावंत, एस. एस. सांगोलकर, उपस्थित होते. चेअरमन सतीश मुळे यांनी बँकेच्या कामाचा स्थापनेपासून आढावा घेतला. यावेळी सहायक निबंधक योगिता मुरडे यांनी बँकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेत समाधान व्यक्त करीत काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. भविष्यात पंढरपूर परिसरातील सर्वच सहकारी संस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यावावत आश्वासन दिले, तसेच बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments