होळी करा लहान, पोळी करा दान या उपक्रमाअंतर्गत १ हजार पोळ्यांचे संकलन... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 14, 2025

होळी करा लहान, पोळी करा दान या उपक्रमाअंतर्गत १ हजार पोळ्यांचे संकलन...

 होळी करा लहान, पोळी करा दान 

या उपक्रमाअंतर्गत १ हजार पोळ्यांचे संकलन...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम...

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शाखेच्या वतीने होळी पौर्णिमा निमित्त ' होळी करा लहान, पोळी करा दान हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात 1 हजार पोळ्या समितीच्या वतीने संकलित करण्यात आले असून यापुढे गोरगरिबांना देण्यात येणार आहे.

 भारतात दरवर्षी होळी सणाला 28 हजार क्विंटल लाकडे जाळले जातात. लाकडांची किंमत कोट्यावधींच्या घरात असते. यामुळे आपली राष्ट्रीय संपत्ती आणि ऊर्जा साधने खूप मोठ्या प्रमाणात वाया जातात. इतकेच नव्हे तर त्यामुळे खूप मोठे वायू प्रदूषण होते. म्हणून आपण होळी अगदी छोटीशी चुकीला कडे व झाडांचा वाळलेला पाला पाचोळा वापरून करावी. होळीचा नैवेद्य म्हणून पुरणपोळी टाकण्यापेक्षा गरिबीमुळे उपाशीपोटी जगणाऱ्यांना पुरणपोळी दान करणे जास्त हितकारक आहे असे यावेळी सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages