Hot Posts

6/recent/ticker-posts

एकाच वेळी विठ्ठलवाडीच्या दोन कर्तबगार सुपुत्रांचा झाला सन्मान

 एकाच वेळी विठ्ठलवाडीच्या दोन कर्तबगार सुपुत्रांचा झाला सन्मान



माढा (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित बाळे यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील योगदानबद्दल दिला जाणारा सन 2024-25 चा आदर्श शिक्षक पुरस्कार विठ्ठलवाडीचे रहिवासी व श्री संत माणकोजी महाराज प्रशाला वाकाव येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे सौदागर अभिमन्यू गव्हाणे यांना तर विठ्ठलवाडी येथील संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात शिपाई पदावर कार्यरत असणारे कैलास विलास सस्ते यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार रविवारी 9 मार्च 2025 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत व पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र माळी यांच्या हस्ते समारंभपूर्वक स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,शाल,फेटा देऊन वितरित करण्यात आला.विशेष बाब म्हणजे एकाच वेळी विठ्ठलवाडीच्या दोन कर्तबगार सुपुत्रांच्या गौरव व सन्मान झाला आहे.

सहशिक्षक सौदागर गव्हाणे हे मागील 28 वर्षांपासून इंग्रजी विषयाच्या अध्यापनाचे उत्कृष्ट पद्धतीने कामकाज करीत आहेत.त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बहुमोल शैक्षणिक योगदान दिले आहे. संस्कारक्षम,ज्ञानी व चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवून ते भविष्यातील स्पर्धेत टिकावेत यासाठी ते अविरतपणे झोकून देऊन अध्यापनाचे कार्य करीत आहेत.त्यांचे अनेक विद्यार्थी पुणे बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये चमकले आहेत.या  बाबींची दखल घेऊन त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

कैलास सस्ते हे मागील 24  वर्षांपासून अत्यंत प्रामाणिकपणे व स्वतःला कोणत्याही कार्यात झोकून देऊन काम करीत आहेत.त्यांनी हायस्कूलच्या मैदानाच्या सर्व बाजूंनी मोठ्या संख्येने वृक्षांचे संगोपन केले आहे.गावातील कोणत्याही प्रकारच्या विधायक सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रीय सहभागी असतात. विशेष बाब म्हणजे ते निर्व्यसनी असून कष्टाळू आहेत.ते एक विद्यार्थी व पालकप्रिय अतिशय गुणी कर्मचारी आहेत म्हणून त्यांना आवडीने विद्यार्थी 'कैलासमामा' या नावाने ओळखतात.या बाबींची दखल घेऊन त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

यावेळी पतसंस्थेचे माजी चेअरमन समाधान घोडके,व्हा. चेअरमन विद्या पाटील, संचालक जवानसिंह रजपूत, मुख्याध्यापक रामदास चव्हाण, सेवानिवृत्त शाखा उपनिबंधक मोहन कदम,मुख्याध्यापक अमोल चव्हाण,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,सचिव नेताजी उबाळे,महादेव परबत,मारुती आवारे,दादा भोगे,प्रविणकुमार बोधले,शिवाजी कदम,ज्ञानेश्वर मस्के,नानासाहेब कांबळे,उषा गव्हाणे,जयश्री गव्हाणे,आदेश गव्हाणे,समाधान घोडके,स्वाती सस्ते,माधुरी सस्ते,स्वाती कदम, विजया पालकर,बबलू पालकर, अक्षय बरबडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments