शिक्षकच संस्कारक्षम पिढी घडवू शकतात-आ. अभिजित पाटील
माढा (कटूसत्य वृत्त):- शिक्षक हा समाजाचा आत्मा असून समाजातील प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे महत्व मोठे आहे.शिक्षकच संस्कारक्षम पिढी घडवू शकतात. माढा तालुका शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्यातर्फे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा माढा येथे संपन्न झाला यावेळी आमदार अभिजित पाटील बोलत होते.पुढे ते म्हणाले की शैक्षणिक उपक्रमात माढा तालुका अग्रेसर आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांची जबाबदारी नक्कीच वाढली आहे.येणा-या पुढच्या काळात शाळाविषयी भौतिक सुविधा शासनाकडून व सिएसआर फंडातून मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. सध्याच्या परिस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींच्या सुरक्षतेसाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे.यावेळी निपुण महाराष्ट्र 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय लीडरमाता उद्बोधन कार्यशाळा सोलापूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी विकास यादव , शिक्षण विस्तार अधिकारी दिगंबर काळे शिक्षक विनोद परिचारक संतोष चव्हाण श्रीकांत काशीद शुभांगी गवळी आणि सुहास चवरे यांचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी सत्कार केला.गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी आपल्या प्रस्ताविकात नविन संचमान्यतेनुसार पट संख्येची जाचक अट रद्द करावी,मानधन तत्वावर कार्यरत असणारे कर्मचारी यांना कायम करण्यासाठी प्रयत्न करावे.ऑनलाईन कामासाठी प्रत्येक केंद्रस्तरावर डाटा एंट्री ऑपरेटर देण्यात यावा आशी मागणी केली.
प्रा.तुकाराम मस्के मनोगत करताना म्हणाले की शिक्षक समाजाचे शिल्पकार आहेत.त्यामुळेच विद्यार्थीचे भविष्य घडत असते.
पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक- संतोष लोहार(अंजनगाव) अर्जून(उपळाई बु) गवळी विकास धांडे(लऊळ) दत्तात्रय केंगार(सापटणे भो)हिराबाई आगरकर(दारफळ ज्ञानेश्वर घोगरे (आढेगाव)शिवानंद बारबोले(माढा) राजकुमार क्षिरसागर(मानेगाव) तानाजी ननवरे(कव्हे) सोमनाथ कांबळे(कुर्डू) तानाजी मिरगणे(म्हैसगाव) अनिल पांडुरंग क्षिरसागर (उजनीनगर) गौरी अंबिके (बारलोणी) संतोष शिंदे(रोपळे) बालाजी ढेमरे(अरण) मनिषा खुणे (लऊळ)चंद्रकांत बसवंत(परिते) नंदू पिसाळ(वरवडे)विशाल धस(मोडनिंब) रामेश्वर लोंढे(रोपळे) हनुमंत भोसले(पिंपळनेर) संजिवनी पौळ(बारलोणी) सेवा निवृत्त विस्तार अधिकारी शोभा लोंढे विषय तज्ञ अभिजीत कसबे वृषाली भोसले(मोडनिंब) शिवकन्या खोचरे (निमगाव) समाधान आवताडे(बेंबळे) याशिवाय मुख्यमंञी माझी शाळा सुंदर जिल्ह्यात द्वितीय जि.प.शाळा अरण तालुकास्तरीय जि.प.शाळा सोलंकरवाडी,खाजगी शाळा गट शारदेय गुरुकुल ,टेंभूर्णी प्रधानमंञी पोषणशक्ती निर्माण योजनेत उत्कृष्ट परसबाग जिल्ह्यात तृतीय जि.प.शाळा वडाचीवाडी(अं.उ) या शाळांचाही गौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विठ्ठल कारखान्याचे संचालक प्रा.तुकाराम मस्के विस्तार अधिकारी दिगंबर काळे माजी जि.प.सदस्य आनंद कानडे प्रगतशील बागायतदार नितीन कापसे युवा नेते शंभूराजे साठे अभिजित साठे यशवंत भोसले,कैलास काशिद आदि उपस्थित होते. प्रस्ताविक गटशिक्षणाधिकारी विकास यादव सूञसंचलन अतुल देशमुख संतोष जाधव यांनी तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी दिगंबर काळे यांनी मानले.
0 Comments