माण नदीत उन्हाळ्यात टेंभूचे पाणी सोडण्याचे नियोजन
- आ. समाधान आवताडे
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पर्यावरण संवर्धन बरोबर माण नदीचा काठ हरित करणे साठी पुढाकार घेऊ. माण नदीत उन्हाळ्यात टेंभूचे पाणी सोडण्याचे नियोजन आहे असे मत पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी माजी सभापती वसंतराव देशमुख , रयत शिक्षण संस्थेचे सचिव जे. जी जाधव, उप प्राचार्य बी एस बळवंत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच रोहिणी सारंग जाधव, सरपंच संजय साठे, माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार, विठ्ठलचे संचालक दशरथ जाधव, माजी सैनिक बाबुराव गोडसे, कल्याण जाधव , सोमलिंग देवस्थान ट्रस्ट , चे अध्यक्ष साहेबराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुरेश गोडसे, प्रगतीशील बागायत दार बालाजी माणिक जाधव , संतोष जगन्नाथ जाधव, आप्पा जाधव, रमेश बनसोडे, माजी उपसरंपच बालाजी जाधव, आनंदराव क्षिरसागर, दिपक भालेकर, पांडुरंग बाजीराव जाधव, प्रमुख उपस्थित होते. प्रास्तविक रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डाॅ. डी एस चौधरी यांनी केले.
प्रारंभी स्वागत पर भाषणात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी. स्वच्छतेतून सेंद्रीय शेतीकडे गावाची वाटचाल सुरू आहे. माण नदीच्या काठांवर वृक्ष लागवढ हाती घेणेत येणार आहे. बांबु लागवडी बरोबर पर्यावरण संवर्धना साठी हरित माण नदी…. पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करणेत येत असल्याचे सांगितले.
आमदार समाधान दादा आवताडे म्हणाले, सेंद्रीय शेती साठी सिध्देवाडी करांनी घेतलेला पुढाकार महत्वपुर्ण आहे. माण नदीच्या संवर्धना साठी सर्वोतोपरी प्रयत्न व मदत करणेत येईल. माण नदीत उन्हाळ्यात पाणी राहणे साठी उजनी तून शक्य नाही झालेस टेंभुर्णी योजनेतून सोडण्यात येणार पाणी सोडण्याचे नियोजन सुरू आहे. रयत शिक्षण संस्थेतील मधील अधिकारी, कर्मचारी व प्राध्यापक यांनी एकत्रित केलेले परिश्रमामुळे संस्था वटवृक्षा प्रमीणे मोठी झाली आहे. असेही आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. या प्रसंगी प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमेचे पूजन आमदार आवताडे यांच्या हस्ते करणेत आले. या प्रसंगी सेपक टकरा या क्रिडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ कामगिरी केले बद्दल नम्रता दिगंबर घुले व भक्ती दिगंबर घुले यांचा आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते सन्मानित करणेत आले. या प्रसंगी प्रा. सौ. सुमन केंद्रे, प्रा नाईकवनरे, प्रा शेख, यांचे सह ग्रामविकास अधिकारी महादेव भुसे, धनश्री कदम, दत्ता दांडगे, यांचा आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते गौरव करणेत आला. या कार्यक्रमा साठी विजय प्रकाश जाधव , पांडुरंग बाजीराव जाधव, भास्कर जाधव, राव साहेब भोपळे, यांनी शिबीर यशस्वी करणे साठी परिश्रम घेतले. आभार प्रा सुमन केंद्रे यांनी मानले.

0 Comments