टेंभुर्णी येथे होणाऱ्या देशमुख-पाटील शाहीविवाह सोहळ्यास शरदचंद्र पवार यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थिती?
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख यांच्या शाही विवाह सोहळ्यास देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज राजकीय नेते मंडळीची उपस्थिती लाभणार आहे. काल दिल्ली येथे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांची भेट घेऊन सुरज देशमुख यांनी निमंत्रण पत्रिका पवारांना दिली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हे देखील उपस्थित होते.
सुरज देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते. माढा विधानसभेच्या तिकीट वाटपावेळी ही त्यांचे नाव स्पर्धेत होते.टेंभुर्णी येथे झालेल्या जाहीर सभेस शरदचंद्र पवार हे टेंभुर्णी येथे आले असता त्यांनी देशमुख परिवाराकडे स्नेहभोजन केले होते. तेव्हाच सुरज देशमुख हे कोण आहेत याची चर्चा जिल्हाभरात झाली होती.त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी उपस्थित राहून त्यांना सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर अतिशय महत्त्वाची युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. मोहिते-पाटील घराण्याचे गेली दशके देशमुख परिवारासोबत आपुलकीचे संबंध राहिले आहेत. पुरोगामी विचारांसोबत चालणारा परिवार म्हणून त्यांच्या देशमुख परिवाराची ओळख आहे. राज्यभरात या परिवाराचा जनसंपर्क असल्यामुळे राज्यातील अनेक दिग्गज राजकीय नेते मंडळी या शाही विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा शुभविवाह सोहळा रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी सांय 7 वा 47 मि संपन्न होणार असून, आतापासूनच तालुक्यात या विवाह सोहळ्याची चर्चा आहे. काल दिल्ली येथे शरद पवार साहेब यांना निमंत्रण पत्रिका देत असताना पवार साहेबांनी आपली आस्थेने विचारपूस केली आणि आपण विवाह सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सुरज देशमुख यांना सांगितले...!
0 Comments