आदिनाथ निवडणुकीसाठी दिग्विजय बागल यांचे इच्छुकांना आवाहन
करमाळा, (कटूसत्य वृत्त):- श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या जाहीर झाली असून , इच्छुक कार्यकर्त्यांनी बागल संपर्क कार्यालयातून आपले नामनिर्देशन पत्र (निवडणूक फॉर्म) भरून सादर करावेत असे आवाहन मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व शिवसेना युवा नेते दिग्विजय बागल यांनी आज केले. याबाबत अधिक बोलताना बागल म्हणाले की, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली असून श्री. आदिनाथ कारखाना गेल्या वीस वर्षापासून बागल गटाच्या ताब्यात आहे. लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल यांनी आदिनाथ कारखान्याला कर्जमुक्त केले होते. मा.आ.शामलताई बागल व रश्मीदिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली व विलासराव घुमरे (सर ) यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ कारखाना सहकार क्षेत्रात अग्रेसर राहावा यासाठी आदिनाथच्या सर्व संचालक मंडळाने अथक प्रयत्न केले आहेत.
0 Comments