मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक- 2 या अभियानामध्ये
श्री.शारदेय गुरुकुल पब्लिक स्कुलला माढा तालुक्यात प्रथम पुरस्कार.
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत राज्य शासनाने राबवलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' (टप्पा क्रमांक - २) या अभियानामध्ये श्री. शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल, टेंभूर्णी शाळेने खासगी शाळा गटात माढा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून तीन लाखांचे पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह मिळाले आहे. शाळेचे प्राचार्य. एस. व्ही. इंगोले, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र* *येऊन या स्पर्धेसाठी नियोजनपूर्वक* *प्रयत्न केले. या प्रयत्नांना या पुरस्काराच्या रूपाने यश आले. आज पर्यंतच्या सर्व प्रयत्नांना* *महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली ही शाबासकीची थाप आहे.या आधीही शाळेला महाराष्ट्रातील नंबर एकचा पायाभूत सुविधांचा पुरस्कार मिळालेला आहे.*
*माढा येथे जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व तालुकास्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पुरस्काराच्या वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.*
*हा पुरस्कार माढा तालुक्याचे विद्यमान आमदार श्री.अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी विकास यादव, विस्तार अधिकारी दिगंबर काळे , केंद्रप्रमुख संतोष वरकुटे व इतर मान्यवर उपस्थित होते.*
*या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बाळासाहेब देशमुख, सचिव हर्षवर्धन देशमुख, संचालक सुरज देशमुख, संस्थेच्या कार्यकारी संचालिका .प्रियंका देशमुख, रावसाहेब देशमुख तसेच नाना - भैय्या युवा मंच यांनी शाळेचे विशेष अभिनंदन केले.*
0 Comments