Hot Posts

6/recent/ticker-posts

बीडचे दानव अंधाधुंद, नाम'देव' अंध? हैवानांच्या मानसिकतेची धर्मशास्त्रींना चिंता

बीडचे दानव अंधाधुंद, नाम'देव' अंध? हैवानांच्या मानसिकतेची धर्मशास्त्रींना चिंता 



माझ्या वडिलांवर झालेले वार दिसले नाहीत का? वैभवी देशमुखांचा नामदेवशास्त्रींना सवाल


बीड (कटूसत्य वृत्त):- सरपंच संतोष देशमुखांच्या निघृण हत्येनंतर 53 दिवसांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे मारेकऱ्यांची पाठराखण केलीय.. यात संतापजनक म्हणजे देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकता मीडियाने का समजून घेतली नाही?

असा अजब सवालच नामदेव शास्त्रींनी केलाय.. तर संतांनी द्वेष आणि सूड यावर बोलायचं असतं, असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावलाय.

हत्या करणाऱ्यांच्या मानसिकतेची दखल का घेतली नाही, असे नामेदवर शास्त्री यांनी सांगितल. सरपंच संतोष देशमुखांची हत्या झालेली असताना नामदेव शास्त्रींना मात्र मारेकऱ्यांचा पुळका का यावा हे अस्वस्थ करणारं आहे....कारण

शास्त्रींना खंडणीखोरांचा पुळका कशासाठी?

दुसऱ्या गावची टोळी पवनचक्की प्रकल्पात का शिरली?

आवादा कंपनीच्या दलित वॉचमनला टोळीने मारहाण का केली?

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मारेकरी तिथं कशासाठी दादागिरी करत होते?

या टोळीने पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला का मारहाण केली?

खंडणी वसुल करणाऱ्यांना शास्त्री निर्दोषत्व देत आहेत का?

हे कमी होतं की काय नामदेव शास्त्रींना हाताला सलाईन लावून गडावर आलेल्या धनंजय मुंडेंचा पुळका आला. मात्र त्यांना निर्घृण हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुखांच्या अंगातलं साकळलेलं रक्त कसं दिसलं नाही असा सवाल मनोज जरांगेंनी केलाय़.

धनंजयने खूप सोसलंय, हाताला सलाईन लावून आलाय, असं भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलं. दुसरीकडे, संतोष देशमुखांचं साकाळलेलं रक्त दिसलं नाही का? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.

खरंतर आवादा कंपनीत घुसून मारहाण करणाऱ्या सुदर्शन घुले आणि टोळीला संतोष देशमुखांनी जाब विचारला. देशमुखांना एकाला चापटही मारली. मात्र त्यानंतर सुदर्शन घुले आणि त्याच्या हैवानांच्या टोळीनं सरपंच संतोष देशमुखांना हाल हाल करुन मारलंय...

हत्येवर 53 दिवस मौन, नंतर खंडणीखोरांची चिंता

तर यात एका बाजूला सरपंच संतोष देशमुख तर दुसऱ्या बाजूला हत्या, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे असलेली मारेकऱ्यांची टोळी आहे.....मात्र नामदेव शास्त्रींनी तब्बल 53 दिवस संतोष देशमुखांच्या हत्येवर मौन बाळगलंय.. तर 53 दिवसांनी शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेची चिंता वाहिलीय....

मात्र नामदेव शास्त्रींच्या अजब आणि संताप आणणाऱ्या तर्कावर साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेत....

शास्त्रींच्या तर्कावर सामचे सवाल

हाणामारीच्या लाखो घटना घडतात. मात्र थेट हत्या करणाऱ्यांच्या मानसिकतेचा विचार कशासाठी?

हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षेसाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या मानसिकतेची चिंता करत बसायची का?

चापट मारल्याच्या रागातून ज्या कुटुंबाचा आधार गमावलाय त्यांच्या मानसिकतेचा विचार कोण करणार?

याचं उत्तर संत म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी द्यायला हवं...त्यामुळेच बीडचे हैवान अंधाधुंद झालेले असताना ग़डावरचा संत, महंत...आणि काही श्रद्धाळूंसाठी तर अवतार असलेला हा देव एवढा अंध कसा?

यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. त्यायानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी नामदेवशास्त्री यांना सर्व पुरावे दिले आहेत. त्यावर देशमुख कुंटुबीयांच्या पाठिशी भगवान गड नेहमीच असेल, असे आश्वासन नामदेव शास्त्री यांनी दिले आहे. तसेच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जे आरोपी आले होते, ते खंडणी मागण्यासाठी आले होते. त्यांनी आमच्या दलित बांधवांना हाणमार केली, म्हणून माझे वडील अडवण्यासाठी गेले होते. मात्र, माझ्या वडिलांनाच माराहण करण्यात आली. त्यांना फक्त ही मारहाण वाटते. मात्र, माझ्या वडिलांवर किती वार झाले आहेत. ते वार त्यांना का दिसले नाहीत, असा सवाल संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांना केला.

माझ्या वडिलांवर किती वार झालेले आहेत. रक्त सांगाळलेले आहे. माझ्या वडिलांवर किती घाव झाले, ते त्यांना दिसले नाहीत का, त्यांच्यावर किती घाव झाले, ते त्यांना का दिसले नाहीत, अशी विचारणा वैभवी देखमुख यांनी केली. तसेच न्यायाधीश सुद्धा वकिलांच्या दोन बाजू ऐकतो आणि नंतरच मत मांडतो. परंतु, शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला दुःख वाटते, अशी खंत वैभवी देशमुख यांनी बोलून दाखवली. आम्हाला वाटते की, त्यांनी आमचीही बाजू ऐकावी आणि नंतर विधान करावे. माझे वडील वारकरी होते, त्या नात्याने जरी आमच्या घरी आले नसले तरी आम्ही त्यांना भेटणार आहोत. आमची बाजू आणि घडलेली घटना त्यांना सांगणार आहोत, असे वैभवी देशमुख यांनी सांगितले.

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे महंत नामदेवशास्त्रींपुढे सादर केले. देशमुख कुटुंबियांनी कधीही जातीयवाद केला नाही. माझ्या भावाने दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला, असं धनंजय देशमुख नामदेवशास्त्रींना म्हणाले. यावर आम्ही आरोपींना पाठीशी घालणार नाही. भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या कायम पाठीशी राहील, असं आश्वासन महंत नामदेवशास्त्री यांनी देशमुख कुटुबीयांना दिले.
Reactions

Post a Comment

0 Comments