आ. कल्याणशेट्टी यांच्यावर आता आमदार निवास समितीची जबाबदारी
अक्कलकेट(कटूसत्यवृत्त):-राज्यातील आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र विधीमंडळाच्या विविध समित्यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप आमदारांची व्यवस्था आणि विधिमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या समतीकडून करण्यात आली आहे. सध्या आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्षपद आहे. आता आमदार निवास व्यवस्थापन समिती अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. आमदारांची संख्या मोठी आहे.
त्यांच्या सुरक्षेबरोबरच निवासाची व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची असते. मुंबईत आकाशवाणी निवास,मॅजेस्टिक आमदार निवास, जुने विधानभवन,विस्तारित आमदार निवास, मनोरा आमदार निवास मुंबई तसेच नागपूर येथील आमदार निवास अशा व्यवस्थेचा समावेश आहे. या ठिकाणी येणाऱ्या आमदार त्याबद्दलच्या तक्रारींचा निपटारा करणे या समितीची मुख्य जबाबदारी आहे. त्याशिवाय याठिकाणी असणाऱ्या आमदारांच्या आहार व्यवस्थेवर देखरेख करणे, खाद्यपेय प्रबंधकांची निवड करणे, उपाहारगृहातील खाद्यपेय पदार्थांचे दर ठरविणे,सदस्यांना उपाहारगृहात चांगले खाद्यपदार्थ तसेच चविष्ट, सकस व उत्कृष्ट प्रतीचे भोजन मिळेल याची दक्षता घेणे, उपाहारगृहात सदस्यांना असुविधा होणार नाही. उपाहारगृहासंदर्भात किंवा निवासाबद्दल सदस्यांकडून आलेल्या तक्रारींची व सूचनांची दखल घेणे व कार्यवाही करणे यासारख्या बाबींची जबाबदारी या समितीवर असते. आ. कल्याणशेट्टी पहिल्यांदाच यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

0 Comments