श्रावणी शिंदे भरतनाट्यम विशारद पूर्ण परीक्षा उत्तीर्ण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, मिरज यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या भरतनाट्यम विशारद पूर्ण परीक्षेत श्रावणी शिंदे उत्तीर्ण झाली आहे. ती इयत्ता पहिलीपासून नटराज नृत्य संगीत विद्यालयात भरतनाट्यमचे सराव करत असून तिला नृत्य गुरु रघुनाथ गड्डम, मोनिका गड्डम द्यावणपल्ली व लतिका गड्डम यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.
ती सध्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेत विजयसिंह मोहिते पाटील ज्युनिअर कॉलेज, कोंडी येथे शिकत असून तसेच तिचे राष्ट्रीय शालेय तलवारबाजी खेळासाठी पण निवड झालेली आहे.
तिच्या ह्या यशाबद्दल रघुनाथ गड्डम, लतिका गड्डम,मोनिका गड्डम तसेच कॉलेजच्या प्राचार्या सौ. सुषमा निळ व संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments