नातेपुते येथील एस एन डी स्कूलमध्ये रेझिंग डे निमित्त सायबर क्राईम व वेपन्सची विद्यार्थ्यांना माहिती
नातेपुते(कटूसत्य वृत्त):-
पोलीस रेझींग डे निमित्त नातेपुते पोलीस ठाणेच्या च्यावतीने नातेपुते येथील एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायबर गुन्हेगारी व वाहतुक नियमांचे पालन या विषयावर नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन करण्यात आले.पोलीस रेझिंग डेच्या औचित्यावर सायबर क्राईमबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात नातेपुते पोलीस ठाणेचे पीएसआय विक्रांत डिगे म्हणाले की, सायबर क्राईमबाबत अनेकांना माहिती नसल्याने त्या संदभार्तील गुन्ह्यामधे वाढ होत आहे. त्यामुळे युवावर्ग विशेषत: शालेय विद्यार्थ्यांनी खबरदारी बाळगून अॅन्ड्रॉइड फोनचा सावधगिरीने वापर करण्याची आवश्यकता आहे. तसेच रस्त्याने चालताना वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे कारण आपला जीव सर्वात महत्वाचा आसल्याचे मत विक्रांत डिगे यांनी व्यक्त केले. पोलीस कॉन्स्टेबल अमोल बंदुके यांनी सर्व विद्यार्थ्यांना एस.एल.आर. रायफल, मशीन कारबाइन, बाराबोर पंप एक्शन गन पोलीस वापर करीत असलेल्या वेपन्सची माहिती सांगितली. यावेळी पोलीस कर्मचारी गणेश कुलकर्णी, मुकुंद पणासे, सचिन आवळे, नवनाथ चव्हाण उपस्थित होते. स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्राचार्य संदीप पानसरे, स्कूल मॅनेजर शकूर पटेल, संस्थेचे पि.आर.ओ.मनोज राऊत तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
चौकटीत :
दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ ला महाराष्ट्र पोलीस विभागास ध्वज सपूर्त केला त्यामुळे तो दिवस स्थापना दिन म्हणून साजरा होतो व २ ते ८ जानेवारी रेझिंग डे सप्ताहाचे आयोजन केले जाते या सप्ताहामध्ये सायबर गुन्ह्याचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती केली जाते. पोलीस दलातील अत्याधुनिक विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते तसेच सायबर सेलच्या कामाबाबत व पोलीस कर्मचारी यांनी वापरण्यात येणारे वेपन्स याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.
महारुद्र परजणे
सहाय्यक पोलीस निरीक्षक
नातेपुते पोलीस ठाणे, नातेपुते.
0 Comments