नूतन विद्यालय कोर्टी येथे बाजार डे उत्साहात संपन्न
कोर्टी (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी संचलित नूतन विद्यालय कोर्टी येथे शनिवारी रोजी शालेय बाजार डे भरवण्यात आला
कोर्टी येथे नूतन विद्यालय येथे शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना, विविध कला क्षेत्रामध्ये वाव मिळावा म्हणून ही शाळा विविध उपक्रम राबवत आहे, त्यातच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना या शाळेमध्ये बाजार डे भरून शालेय विद्यार्थ्यांना स्वावलंब व आपला काम करून पैसे कसे कमावता यावे व व्यवहार ज्ञान कसे असावे याचे ज्ञान या बाजार डे मधून व्हावे म्हणून हा बाजारा डे भरवण्यात आला आहे असे या शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद संत सर यांनी सांगितले
या बाजार डे मध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, पालक भाज्या, मेथी कोथिंबीर टमाटे बटाटे, तर काही विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भेळ पाणीपुरी आलू पराठा चॉकलेट बिस्कीट कुरकुरे उडीद वडा गुलाब जामुन खारी बटाटे वडा भजी शेंग चटणी दही धपाटे आप्पे खोबरे चटणी इत्यादी पदार्थ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी बाजार डे निमित्त विक्री करता ठेवण्यात आले होते या बाजार डे विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेतील मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका शिपाई व सर्व स्टॉप जणांनी या बाजार डे चा मनसोक्तपणे आनंद घेतला
हा आनंदी बाजार डे उत्साहात साजरा करण्यासाठी नूतन विद्यालय येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका व शिपाई स्टॉप यांनी अधिक परिश्रम घेतली
0 Comments