आढेगाव खेळाच्या जिद्दीने, खेळाच्या सामर्थ्याचे, खेळाचे भविष्य बनवूया "डॉ करंदीकर सर
टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त) :- न्यू इंग्लिश मेडियम स्कूल आढेगाव येथे क्रीडासप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयंत करंदीकर सर यांनी आपले मनोगतातून असे व्यक्त केले की,
" तेला वाचून काय किंमत समईच्या वातीला
पाण्या वाचून काय किंमत भूमीच्या या मातीला
धारे वाचून काय किंमत तलवारीच्या पातीला आणि
गुरूं वाचून काय किंमत विद्यार्थ्यांच्या जातीला."
"खेळाच्या जिद्दीने ,खेळाच्या सामर्थ्याचे ,खेळाचे भविष्य बनवूया".त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक विकास कशा पद्धतीने करावा याबद्दल त्यांनी आपले आध्यात्मिक विचार मुलांसमोर मांडले. त्याचबरोबर मा. जि.प.सदस्य.चित्राताई वाघ , केंद्रप्रमुख समीर काळे,उपसरपंच ज्ञानेश्वर वाघ, ता.प.उप. स. धनाजी जवळगे , या उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मुलांना प्रेरणादायी जीवनकौशल्यात्मक विचार दिले. यावेळी सो.सा.चे.सोमनाथनाना जवळगे, सरपंच कांतीलाल टेळे , रघुनाथ वाघ,ॲड युवराज टकले, पै.भाऊ पिसाळ, किशोर टकले, हरिदास जवळगे , चे.शंकर सुरवसे, चे. लक्ष्मण विरकर, नानासाहेब रुपणवर, दादासाहेब चव्हाण, नारायण पारेकर, मच्छिंद्र व्यवहारे ,क्रिडाशिक्षक किरण राऊत,नितीन टकले , रामायणाचार्य अभिमान शिंदे , नकुल रुपनवर , भिवा खरात, युवराज तांबवे व पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .
उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रिडाध्वजारोहन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे ,पाहुण्यांचे व पालक वर्गांचे स्वागत ॲड दत्तात्रय रुपनवर व सचिव दीपाली जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पालकांचे देखील विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले .विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या निमित्ताने कराटे, कबड्डी ,खो-खो, रंनिग,बॉल पासिंग , तोंडाने बिस्कीट खाणे बॉटल रेस , थ्री लेग्गड रेस, लिंबू चमचा, फ्राग जंप इत्यादी विविध खेळ घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा माने तर प्रास्ताविक समीर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. रुपनवर सर यांनी केले.
तसेच सहशिक्षक कर्मचारी वर्ग हा अतुल माने, अतिश चव्हाण ,साजन शिंगाडे,नितीन शिरतोडे, सरिका तिपाले, दीपाली चव्हाण,सुप्रिया पाटील, स्नेहल गायकवाड, ज्योती जेठवा यांनी व्यवस्थित रित्या कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केले.
0 Comments