मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांनी प्रस्ताव दाखल करावेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 22, 2025

मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांनी प्रस्ताव दाखल करावेत

 मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांनी प्रस्ताव दाखल करावेत

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय अनुदानित, विना अनुदानित, कायम अनुदानित शाळांची त्यांच्या शाळेत शिक्षण घेत असलेलया इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे सर्व मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तालुक्यातील शाळांनी संबधित  पंचायत समितीकडे दाखल करावेत असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक श्रीमती मनिषा फुले यांनी केले आहे.

           शासन निर्णयानुसार व विहीत प्रपत्रात सन 2024-25 चे प्रस्ताव सादर करण्यात यावे, तसेच सोलापूर शहरातील प्राथमिकचे प्रस्ताव प्रशासन अधिकारी सोलापूर मनपा शिक्षण मंडळ सोलापूर यांचे कार्यालयास व सोलापूर शहरातील माध्यमिक शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालयास सादर करण्यात यावेत


           विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरीता मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना यापुर्वी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचे कार्यालयामार्फत राबविण्यात येत होते. दि.10 डिसेंबर 2024 व शासन शुध्दीपत्रक दि.26 डिसेंबर 2024 अन्वये सदरची योजना सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करून सदर विभागाकडून ही योजना सन 2024-25 या वर्षापासून कार्यान्वित झाली असल्याचेही इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक श्रीमती फुले यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages