नातेपुते येथील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिन साजरा
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते, येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मतदार शपथ व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. प्रा.डॉ.डी.एस.थोरात यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की नवतरुण मतदारांनी मतदान करणे, हे आपले आद्य कर्तव्य समजून निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे. महाविद्यालयीन युवकांनी मतदान जनजागृती अभियानात सहभागी होऊन लोकांना मतदानासाठी प्रवृत्त केले पाहिजे तसेच मतदार नोंदणी वाढवली पाहिजे.यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.जे.डी. मुळीक यांनी शपथ वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.उत्तम सावंत यांनी केले तर आभार प्रा.डॉ. सुनिता सूर्यवंशी यांनी मानले. सदर कार्यक्रमासप्रा.डॉ.बी.टी.निकम, प्रा.डॉ.डी.एम.साळवे,प्रा.वैभव गवळी,प्रा.सौ नलिनी वाघ,प्रा. कु.कदम, प्रा.अनिल घेमाड, ग्रंथपाल प्रा.दिलीप शिंदे, एच.टी.वाघमोडे, नागराज करपे,शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments