अकलूज येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 8, 2025

अकलूज येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन

 अकलूज येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन




अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्यावतीने शिवतीर्थ आखाङा शंकरनगर -अकलूज येथे दिनांक १२, १३ व १४ जानेवारी २०२५ या कालावधीत अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक स्पर्धा व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
        सहकार महर्षी  साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोहिते पाटील यांनी ही माहिती दिली.या वेळी वसंतराव जाधव,महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर,मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले- पाटील,सचिव बिभीषण जाधव, बाळासाहेब सावंत,प्रा.अरविंद वाघमोडे,उमेश भिंगे,विश्वास शेवते,सतिश शेखर प्रमुख उपस्थित होते.
                  वसंतराव जाधव म्हणाले की,स.म.शंकराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते- पाटील,प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपारांणी मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
         मदनसिंह मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले की,या स्पर्धेचे हे ४६ वे वर्ष आहे.स्पर्धेत दिल्ली,हरियाणा,पंजाब,उत्तर प्रदेश,महाराष्ट्र येथील राष्ट्रीय स्तरावरील मल्ल सहभागी होतात.ञिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धेसाठी  खुल्या गटाकरिता प्रथम क्रमांकाचे बक्षिस त्रिमूर्ती केसरी चषक व दोन लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दिड लाख रुपये,तृतीय क्रमांकासाठी एक लाख रुपये व चतुर्थ क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आले आहेत तर वजनी गटासाठी २५ ते  ८५ किलो पर्यंत एकूण १५ गटानुसार विजेत्या व पराजित मल्लांनाही भव्य बक्षीस दिली जातात.या स्पर्धेत एकूण सुमारे  ११ लाखाची रोख बक्षीसे
असून सुमारे ७५० मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील.दि.१२ रोजी सायंकाळी ४ वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार असून दि.१४ रोजी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेचा बक्षीस समारंभास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचेसह प्रमूख पाहुणे पद्मश्री पुरस्कार,अर्जुन पुरस्कार व रुस्तम-ए-हिंद पुरस्कार प्राप्त नामांकित मल्ल सतपाल यांच्या हस्ते होणार आहे.                                                
          दि.१२ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मल्लांनी आपली वजने शिवतिर्थ आखाड्यात देण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.शेवटी आभार उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages