Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

 मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या प्रजासत्ताक  दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 09.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस आयुक्त मुख्यालय, सोलापूर येथे होणार आहे.


            ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार असून, या समारंभास मान्यवर नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे असे, आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments