यश करिअर अकॅडमी मधील महादेव पारसेची सीआयएसएफ मध्ये निवड
झाल्याबद्दल सन्मान
नातेपुते(कटुसत्य वृत्त) :-
नातेपुते येथील यश करिअर अकॅडमी मधील पहिला विद्यार्थी महादेव पारसे राहणार खळवे तालुका माळशिरस हा सीआयएसएफ मध्ये भरती झाला असून त्याचा सन्मान खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या शुभहस्ते घेण्यात आला. यावेळी नातेपुते नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे मा. पंचायत समिती सदस्य माऊली पाटील उद्योजक अतुल पाटील यश करिअर अकॅडमी चे संस्थापक मेजर अनिल माने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलत असताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, पारसे हा भरती झाला ही आपल्या तालुक्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. ही यश अकॅडमी मेजर अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते सारख्या या ग्रामीण भागाच्या ठिकाणी चालू आहे. मेजर माने अतिशय मेहनतीने मुलांना घडविण्याचे काम करीत आहेत. पारसे यांना मिळालेले यश रूपाने खऱ्या अर्थाने मेजर अनिल माने यांच्या कार्याची पोच पावती मिळाली असल्याचे मत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक अनेक नागरिक उपस्थित होते.
0 Comments