लग्न वाढदिवसाचा सोहळा !
राजकीय गोतावळा झाला गोळा ....
पंढरपूर (कटुसत्य वृत्त) :-
कोणत्या कार्याला कोण उपस्थित
राहावं , अगदी ठरलेलं असतं.
परंतु लग्नाचा वाढदिवस . या वाढदिवसाला राजकीय व्यक्तींची उपस्थिती ? हो , असाच एक वाढदिवस सोहळा मागील महिन्यात साजरा झाला, तोही हरिश्चंद्राचा. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील हरिश्चंद्र तळेकर यांच्या लग्नाचा विसावा वाढदिवस राजकीय सवंगड्यांच्या उपस्थितीत साजरा झाला.
हरिचंद्र तळेकर हे सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्व.
श्रीमंतीत वाढलेल्या या युवकाला
ऐन उमेदीत धक्का बसला. पिता देवचंद तळेकर यांना २० जानेवारी २००३ रोजी पक्षाघात झाला. अंथरुणावर पडून असलेल्या पिताश्रींची सेवा करण्यात आखे कुटुंब गुंतले. घाई घाईत तळेकर कुटुंबात लग्नकार्य झाले . २० डिसेंबर २००४ रोजी
हरिश्चंद्र तळेकर विवाह बंधनात अडकले . कर्जबाजारी झाले.
तळेकर यांनी या काळात
भैरवनाथ बचत गटाच्या माध्यमातून समाजसेवेत उडी घेतली. माणूस कर्जबाजारी झाला की त्याचे कशातच मन लागत नाही. कर्ज फेडता फेडता वीस वर्षाचा कालावधी लोटला.
मुले मोठी झाली हे देखील उमजले नाही. मागील दीड वर्षांपूर्वी वडील देवचंद तळेकर यांचे देहावसान झाले. या पडझडीच्या काळातून दिवस घालवलेल्या तळेकर कुटुंबाला
आता थोडासा दिलासा मिळाला.
विधानसभेची धामधुम संपली. तोच डिसेंबर महिना उजाडला.
२० डिसेंबर २००४ या दिवसाची आठवण तळेकर कुटुंबाला झाली. याच दिवशी हरिचंद्र तळेकर आणि विक्रम तळेकर या भावंडांचा विवाह झाला होता. झाले, ठरले लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा. त्यांच्या राहत्या घरी दादाश्री निवासमध्ये तयारी झाली. अगदी २० वर्षांनी साजऱ्या झालेल्या या वाढदिवसाला अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली.
या मंडळींमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका
कलाताई खटके , माजी सरपंच
मोहन तळेकर, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब माळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर भारत कोरके , विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची रिकवरी मॅनेजर
संभाजी थिटे, सोसायटीचे माजी चेअरमन संजयभाऊ तळेकर,
ग्रा.पं. सदस्य ॲड. नितीन खटके, जानुबाई देवी सोसायटीचे चेअरमन रामदास माळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कृष्णात माळी, डॉ. औदुंबर तळेकर, डॉ. मृदुला तळेकर, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजकुमार टरले,
भाजपाचे अजय जाधव, सतीश माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments