राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन हुतात्मा स्मृती मंदिर येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते. प्रमुख अतिथी दी आर्ट ऑफ लिव्हिंग देव गोसकी, अनुपमा गोसकी यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी माता-पालक संघाचे सदस्य शितल पवार, प्रेमा कुंभार, पालक शिक्षक संघाचे सदस्य ज्योतिबा खट्याळ संस्थेच्या खजिनदार ललिता कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले,नेताजी प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, संगीत विद्यालयाचे संचालक विश्वाराध्य मठपती, नेताजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी प्रास्ताविकेतून शाळेचे अहवाल वाचन केले.त्यानंतर पी.पी.टी.द्वारे शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दाखवण्यात आले. स्नेहसंमेलनात जगाला तुझ्या रूपाचा, डान्स का भूत, अंगारू का अंबर सा, नाना नानी दादा दादी, श्रीराम गाणे, तारक मेहता का उल्टा चश्मा, आरंभ है प्रचंड, नेताजी, पिचली माझी बांगडी, धनगर वाड्यात, सणांची ओळख, शिवरायांचा इतिहास, ढोलीडा ढोल बाजे, बम भोले बम, आदी विविध गाण्यावर नृत्य सादर केले. स्नेहसंमेलनात बालवाडी ते सातवीपर्यंतच्या ३३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार कुंभार यांनी केले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन सुजाता फुलारी व उज्ज्वला भांड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
0 Comments