होटगीतील बृहन्मठात शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर, दि. १०- होटगी मठाचे तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्याराधानानिमित्त श्रीशैल, काशी व उज्जैन जगदगुरूंच्या दिव्य सान्निध्यात महास्वामीजींची समाधी शिलामंदिर लोकार्पण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहणाबरोबरच विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे क्रिया आयोजन करण्यात आल्याची माहिती काशीपीठाचे जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवार, १३ ते २२ डिसेंबर या कालावधीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील मठात संस्थेचे अध्यक्ष चन्नयोगि राजेंद्र शिवाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सर्व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार, १३ रोजी सकाळी सहा वाजता श्री जगदगुरू पंचाचार्य ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.रविवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता बाळीवेस येथील मठातून तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शीला मूर्तीची असंख्य भक्तांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक श्री मल्लिकार्जुन मंदिर, मधला मारुती, आजोबा गणपती, गुरूभेट, सात रस्ता, मजरेवाडी, सिध्देश्वर सहकारी साखर कारखानामार्गे होटगी मठात पोहोचल्यानंतर सांगता होणार आहे. दुपारी चार वाजता नूतन मंदिरास शिखराभिषेक करण्यात येणार आहे. सोमवार, १६ डिसेंबर रोजी योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्या औचित्य साधून योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची क्रिया समाधी शिला मंदिर लोकार्पण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण व धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिध्दाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, काशी
जगदगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन जगद्गुरू सिध्दलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते होणार आहे.या कार्यक्रमास महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातील अनेक मठांचे शिवाचार्य गण उपस्थित राहणार आहेत. याशिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खा.प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, सुभाष देशमुख,देवेंद्र कोठे, राणाजगजितसिंह
पाटील, दिलीप सोपल, प्रकाश हुक्कीरे (बेळगाव), वी. आर. पाटील (आळंद), माजी आ. सिध्दाराम म्हेत्रे, दिलीप माने,विश्वनाथ चाकोते, सिद्रामप्पा पाटील, शिवशरण पाटील, मधुकरराव चव्हाण, बसवराज
पाटील, रविकांत पाटील, इराण्णा चरंतीमठ (बागलकोट), सुभाष गुत्तेदार, सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, महेश कोठे, राजशेखर शिवदारे, सिध्दय्या स्वामी, अमर पाटील, इंदुमती अलगोंड-पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.होटगी येथे योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या पुण्याराधनानिमित्त तपोरत्नं मंदिराच्या कळसारोहणाचा संपूर्ण खर्च होटगी गावातील सासरी गेलेल्या सर्व जाती-धर्मातील सुकन्या व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आल्याची माहिती निघणार आहे. पंचक्रोशीतील भक्तांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले. या पत्रकार परिषदेस नागणसूर जगद्गुरूंच्या दिव्य सान्निध्यात गुरुवंदना शुक्रवार, २० डिसेंबर रोजी रात्री १०.१० वाजता श्रीशैल व काशी जगद्गुरूंच्या दिव्य सान्निध्यात तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींचा आत्मज्योत प्रज्वलन व गुरुवंदना कार्यक्रम होणार आहे. शनिवार, २१ रोजी सकाळी आठ वाजता आत्मज्योतीची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर दुपारी धर्मसभा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २२ रोजी पाळणा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, १३ ते १६ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी आठ वाजता श्री रुद्र होम हवन पूजा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. तसेच १३ ते १९ डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी (जिंतूर) यांचे शिवकथा प्रवचन होणार आहे.श्रीशैल जगद्गुरूंची इष्टलिंग महापूजा तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त मंगळवार, १७ ते २० डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी आठ वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी
मठात श्रीशैल जगद्गुरूंची इष्टलिंग महापूजा भक्तिभावात संपन्न होणार आहे. या महापूजेत भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी यांनी दिली.महास्वामीजींच्या पुण्याराधना- निमित्त होटगी संस्थेच्या अक्कलकोट रोड, भवानी पेठ
येथील शिक्षण संकुलात रक्तदान शिबिर व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार,२० रोजी बोरामणी येथून सकाळी आठ वाजता पालखी सोहळा मठाचे श्रीकंठ शिवाचार्य
स्वामीजी, शहापूर मठाचे सुगुरेश्वर स्वामीजी, संचालक प्रकाश जम्मा, शिवा नंद पाटील,
शशिकांत रामपुरे, मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे, अमोगसिध्द कुंभार, यमुनाप्पा होटगोंड, शांतू स्वामी, संतोष हिरेमठ, हनुमंत पाटील, बसवेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.
0 Comments