Hot Posts

6/recent/ticker-posts

तालुकाध्यक्षपदाचा शंकर म्हेत्रे यांचा राजीनामा

 तालुकाध्यक्षपदाचा शंकर म्हेत्रे यांचा राजीनामा




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-  अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय काँग्रेसचे  तालुका अध्यक्ष म्हणून नेतृत्व करणारे शंकर मेत्रे यांनी आज अखेर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच 250 अक्कलकोट विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांचा दारुण पराभव झाल्याने शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी अक्कलकोट तालुका काँग्रेस (आय)पक्षाचे तालुकाध्यक्ष या नात्याने पराभवाचे नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा सोमवारी जिल्हा काँग्रेस भवन सोलापूर येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवून दिल्याचे शंकर म्हेत्रे यांनी सांगितले. यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, सलगरचे उपसरपंच काशिनाथ कुंभार ,शाकीर पटेल ,विनीत पाटील, नागराज पाटील, रमेश चव्हाण, लक्ष्मण चितळे आदींची उपस्थिती होती.
गेल्या अनेक ‌ वर्षापासून मतदारसंघात एक निष्ठेने काम करणारे म्हेत्रे घराणा आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कंटाळले आहेत. याचे कारण ही तसेच आहे, गेल्या अनेक वर्षापासून पक्ष फंडाची अपेक्षा न करता केवळ जनसेवा म्हणून स्वखर्चाने मतदारसंघ सांभाळणारे शंकर म्हेत्रे हे आज‌‌ काँग्रेस वरिष्ठांच्या  मनमानी कारभारामुळे तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था ,जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ,विधानसभा, नगरपालिका, लोकसभा, बाजार समिती, सेवा सोसायटी असे कुठल्याही निवडणुका असल्या तरी नेहमीच शंकर म्हेत्रे हे स्वखर्चाने निवडणुकीचा भार ते सोसत असत. आज पर्यंत स्वतःच्या बळावर ते निवडणुका लढवत आले आहेत. त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत पक्षाकडून मिळाले नाहीत . तसेच त्यांना आज पर्यंत काँग्रेस पक्षाचे फंड्स‌ देखील मिळाले नाही.


जिल्हा परिषद निवडणूक असू द्या अथवा विधानसभा निवडणुका असू किंवा लोकसभेची निवडणूक असू द्या प्रत्येक निवडणुकाच्या काळामध्ये म्हेत्रे घराणा स्वतःचा घर जाळून घेऊन स्वतःच्या हिंमतीवर लढताना दिसून आले आहे .परंतु आज मात्र काँग्रेस पक्षाकडून कुठलीही मदत मिळताना दिसून येत नसल्याने म्हेत्रे घराण्याला आज ही निवडणूका जड वाटताना दिसून येत आहे. इकडे तालुक्यात प्रतिस्पर्धी भाजप पक्षाला मात्र कोट्यावधी रुपयांचा फंड्स मिळताना दिसून येत‌ आहे.परंतु आजपर्यंत काँग्रेस पक्षाकडून‌ मतदार संघात म्हेत्रे घराण्याला  कुठल्याच प्रकारची मदत झालेली दिसून आले नाही. प्रतिस्पर्धी भाजपवाल्याने मला व माझ्या म्हेत्रे कुटुंबीयांना अनेक वेळा अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. परंतु मी त्यांना न जुमानता त्यांना प्रतिकार करण्यात माझा संपूर्ण कार्यकाल खर्ची घातला आहे .तरी देखील काँग्रेसच्या वरिष्ठांना कुठलीच किंमत वाटताना दिसून आले नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील या गोष्टीची कधीच दखल घेताना दिसून आले नाहीत. म्हणूनच आज या सर्व गोष्टीला वैतागून आणि वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाला कंटाळून आज मी माझी भूमिका घेत आहे. याचबरोबर यंदाच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभव याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आज मी माझ्या‌ तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. परंतु यापुढेही मी मतदार संघातील  जनसेवेसाठी  मात्र ‌तत्पर असेन. यापुढे मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भीक घालणार नसल्याची भूमिका शंकर म्हेत्रे यांनी घेतली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या  निष्क्रियतेच्या भूमिकेमुळे‌ मतदार संघात पक्षाची हानी होत असल्याने  माझी भूमिका या ठिकाणी मांडत असल्याचे शंकर म्हेत्रे यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून एक निष्ठेने काँग्रेसची सेवा करणारे म्हेत्रे घराणा आज काँग्रेस पासून अलिप्त होताना दिसून येत आहे.
अनेक वेळा भाजपवाल्यांनी मला विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकून मला जेलमध्ये टाकण्यासाठी अथवा मला वेळोवेळी अडचणीत आणण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले . त्यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र म्हेत्रे कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले  नाहीत. म्हणून आज मी माझी भूमिका घेत असल्याचे शंकर म्हेत्रे यांनी सांगितले.
यापुढे काँग्रेसची सेवा करण्यापेक्षा मी माझ्या स्थानिक जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असेन परंतु या वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांची मनमानी मात्र कधीच खपून घेणार नसल्याचे सांगितले. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपर्यंत काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम फक्त आणि फक्त हे म्हेत्रे घराण्यांकडूनच झाले आहे.  या सर्व गोष्टींचा विचारपूस करून चिंतन करून अखेर आम्ही या काँग्रेस पक्षापासून दूर राहण्याची भूमिका घेत असल्याचे शंकर म्हेत्रे यांनी सांगितले . काँग्रेस पक्ष संकटात असतानाही म्हेत्रे कुटुंबीय मात्र काँग्रेस पक्षापासून कधीच फारकत घेतली नाही. अनेक लोक काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागल्याने पक्ष सोडून गेले. तर काहीजण ईडीच्या भीतीने पक्षांतर केले. परंतु म्हेत्रे घराणा मात्र काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी मतदारसंघात अहोरात्र झटल्याचे शंकर म्हेत्रे यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments