गणपती फार्मसीमध्ये डॉ. शेंडगे यांचे औषधनिर्मिती क्षेत्रावर मार्गदर्शन
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- अकोले खुर्द, टेंभुर्णी येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च येथे विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती क्षेत्राबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मार्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, टेंभूर्णी येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. लालासाहेब शेंडगे यांचे "आधुनिक औषधनिर्मिती आणि आरोग्य सेवा" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानादरम्यान डॉ. शेंडगे यांनी औषधनिर्मितीच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि औषधांच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी आरोग्यसेवेत फार्मासिस्टच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले. तसेच औषधनिर्माणशास्त्र शाखेमध्ये करिअरच्या संधी, क्षेत्रातील आव्हाने, आणि औषधनिर्मिती व्यवसायातील भविष्यातील संधी यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ.आर.डी.बेंदगुडे,अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ.आर.आर बेंदगुडे, प्रा.नामदेव शिंदे, प्रा.शिवराज ढगे, प्रा.धनश्री कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रशांत मिसाळ यांनी केले.
या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.हे व्याख्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरले असून सदर कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून प्रा.कल्याणी माने यांनी काम केले.
0 Comments