डॉ बाबासाहेब आंबेडकराविषयी प्रेम असेल तर एनडीएतुन बाहेर पडावे
- फारूक शाब्दी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात सोलापुरात राजकीय वातावरण तापले आहे.भारतीय संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर बाबत वक्तव्य केल्याने देशभरात भाजप विरोधात संतापाची लाट उसळली आहे.सोलापुरात एमआयएमच्या वरून शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात निदर्शने करत धरणे आंदोलन केले."मी आंबेडकर " I am Ambedkar",अशा आशयाचे फलक हातात घेऊन एमआयएमने सर्वांचे लक्ष वेधले होते.हाजी फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी सोलापूर जिल्हा परिषदे समोर कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.हिजाबधारी मुस्लिम महिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जगणे सोपे झाले अशी माहिती एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
निदर्शने आंदोलनात ऑल इंडिया मजलिस ए ईत्तीहाद उल मुस्लिमीनचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments