Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डूवाडी येथे ७८ वा होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा

 कुर्डूवाडी येथे ७८ वा होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा



पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केले वृक्षारोपण 

कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- ७८ वा होमगार्ड वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोलापूर होमगार्ड जिल्हा समादेशक तथा पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रनायक एकनाथ सुतार प्रशासकीय अधिकारी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन कुर्डूवाडी होमगार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य होमगार्ड वर्धापन दिन सोहळा सत्ता सात ते 13 डिसेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो. कुर्डूवाडी मध्ये वृक्षारोपण करून वर्धापण दिन साजरा करण्यात आला.

होमगार्ड सैनिकांनी कोरोना काळात कर्तव्य करून शासनाला मोलाचे सहकार्य केले. कायदा व सुव्यवस्था निवडणुका सार्वजनिक उत्सव बंदोबस्त होमगार्ड फार चांगल्या जबाबदारीने कर्तव्य बजावतात. होमगार्डच्या कार्याची प्रशंसा करत सर्व मान्यवरांनी होमगार्ड सेवा ही पोलिसांचे सच्चे साथीदार असल्याचे सार्जंट प्रफुल जानराव यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच कुर्डुवाडी समादेशक प्रभारी अधिकारी स्वप्नील खुणे यांनी आपल्या मनोगतात होमगार्ड सैनिकांच्या कर्तव्याचे कौतुकास्पद अभिनंदन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक फलटण नायक गणेश बागल यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्जंट प्रफुल जानराव व फलटण नायक गणेश बागल, सागर काळे तसेच पथकातील पुरुष व महिला होमगार्ड यांची उपस्थिती लाभली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments