पाकीटबाज व टेंडरबाज मराठा समन्वयक गेलेत कुठे
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाल्याने अख्खा महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले. बीडमधील मुंडे बहीण_भाऊ सोडले तर सर्वच लोकप्रतिनिधीनी या हत्येच्या निषेधार्थ अधिवेशनात आवाज उठविला. तसेच राज्यातील सत्ताधारी व विरोधकांनीही हे प्रकरण लावून धरले.
परंतु, सोलापूरातील मीडिया पुरस्कृत व तथाकथित स्वयंघोषित मराठा समन्वयकांनी मात्र या दुर्दैवी घटनेचा साधा निषेधही नोंदविला नाही किंवा याबाबत आवाज उठविल्याचेही कुठे दिसले नाही. या घटनेतील हत्या झालेला सरपंच संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख व हिंदुत्ववादी विचारसरणी मानणारा होता. तरीही सोलापुरातील भाजप समर्थक मराठा समन्वयकांनी या घटनेचा साधा निषेध नोंदविला नाही.
याउलट वाल्मिक कराडचे कार्यकर्ते असणारे व संतोष देशमुखच्या हत्येनंतर 'बाप तो बाप रहेगा' असे स्टेट्स ठेवणाऱ्या त्या कराड समर्थकांसोबत काही मराठा समन्वयकांची मैत्री व उठबस अजूनही चालूच आहे. तसेच खंडणीखोर गुंड वाल्मिक कराडच्या समर्थकांशी दुश्मनी नको म्हणून हे स्वयंघोषित मराठा समन्वयक मूग गिळून गप्प बसले आहेत. अन् या तथाकथित मराठा समन्वयकांना स्टंटबाजीचे इवेंट देवून मराठा समाजाचे नेतृत्व असल्याचे भासविणारी सोलापुरातील (एखादं_दुसरी) पाकीटबाज मिडियाही या प्रकरणात शांतच आहे. निदान त्या पाकीटबाज मीडियावाल्यांनी तरी मूग गिळून गप्प बसणाऱ्या त्या तथाकथित मराठा समन्वयकांना या निर्घुण हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ TRP वाढेल असा काहीतरी इवेंट मीडियाबाज समन्वयकांना द्यावा. हाच प्रकार प्रत्येक जिल्ह्यात कमी_जास्त प्रमाणात आहे.
विशेष_निरीक्षण - काही तथाकथित मराठा समन्वयक व माझे हितशत्रू असणारी काही लोकं व मीडियातील पाकीटबाज एखादं_दुसरा पत्रकार, वाल्मिक कराड व त्याचा मुलगा आणि त्यांच्या समर्थकांना माझी सर्वकाही माहिती काढून ती माहिती व्हाया_व्हाया पुरवीत आहेत. माझी माहिती पुरविणाऱ्यावर किंवा त्यांच्या कुटुंबावर भविष्यात वाल्मिक कराड सारख्या कोण्या गुंडांनी अन्याय केला तर त्यावेळेस सगळ्यात पहिला आवाज उठविणारा व्यक्ती मीच असेन. तुमच्या पैकी कित्येकांना गुप्तपणे का होईना यापूर्वीही मी मदत केलेलीच आहे. त्यामुळे माझी माहिती देण्याच्या भानगडीत पडू नका. नाहीतर नाईलाजास्तव मला तुमच्या मागे पडावे लागेल. त्या अस्तिनीतील सापांना सावध करण्यासाठी हा पोस्ट प्रपंच केला.
असो... जास्त काही लिहीत नाही. पक्षीय मराठ्यांनी निदान आतातरी संतोष देशमुखच्या निर्घुण हत्येचा निषेध नोंदवा.
परंतु, सोलापूरातील मीडिया पुरस्कृत व तथाकथित स्वयंघोषित मराठा समन्वयकांनी मात्र या दुर्दैवी घटनेचा साधा निषेधही नोंदविला नाही किंवा याबाबत आवाज उठविल्याचेही कुठे दिसले नाही. या घटनेतील हत्या झालेला सरपंच संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख व हिंदुत्ववादी विचारसरणी मानणारा होता. तरीही सोलापुरातील भाजप समर्थक मराठा समन्वयकांनी या घटनेचा साधा निषेध नोंदविला नाही.
याउलट वाल्मिक कराडचे कार्यकर्ते असणारे व संतोष देशमुखच्या हत्येनंतर 'बाप तो बाप रहेगा' असे स्टेट्स ठेवणाऱ्या त्या कराड समर्थकांसोबत काही मराठा समन्वयकांची मैत्री व उठबस अजूनही चालूच आहे. तसेच खंडणीखोर गुंड वाल्मिक कराडच्या समर्थकांशी दुश्मनी नको म्हणून हे स्वयंघोषित मराठा समन्वयक मूग गिळून गप्प बसले आहेत. अन् या तथाकथित मराठा समन्वयकांना स्टंटबाजीचे इवेंट देवून मराठा समाजाचे नेतृत्व असल्याचे भासविणारी सोलापुरातील (एखादं_दुसरी) पाकीटबाज मिडियाही या प्रकरणात शांतच आहे. निदान त्या पाकीटबाज मीडियावाल्यांनी तरी मूग गिळून गप्प बसणाऱ्या त्या तथाकथित मराठा समन्वयकांना या निर्घुण हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ TRP वाढेल असा काहीतरी इवेंट मीडियाबाज समन्वयकांना द्यावा. हाच प्रकार प्रत्येक जिल्ह्यात कमी_जास्त प्रमाणात आहे.विशेष_निरीक्षण - काही तथाकथित मराठा समन्वयक व माझे हितशत्रू असणारी काही लोकं व मीडियातील पाकीटबाज एखादं_दुसरा पत्रकार, वाल्मिक कराड व त्याचा मुलगा आणि त्यांच्या समर्थकांना माझी सर्वकाही माहिती काढून ती माहिती व्हाया_व्हाया पुरवीत आहेत. माझी माहिती पुरविणाऱ्यावर किंवा त्यांच्या कुटुंबावर भविष्यात वाल्मिक कराड सारख्या कोण्या गुंडांनी अन्याय केला तर त्यावेळेस सगळ्यात पहिला आवाज उठविणारा व्यक्ती मीच असेन. तुमच्या पैकी कित्येकांना गुप्तपणे का होईना यापूर्वीही मी मदत केलेलीच आहे. त्यामुळे माझी माहिती देण्याच्या भानगडीत पडू नका. नाहीतर नाईलाजास्तव मला तुमच्या मागे पडावे लागेल. त्या अस्तिनीतील सापांना सावध करण्यासाठी हा पोस्ट प्रपंच केला.
असो... जास्त काही लिहीत नाही. पक्षीय मराठ्यांनी निदान आतातरी संतोष देशमुखच्या निर्घुण हत्येचा निषेध नोंदवा.
आपलाच - ॲड. योगेश (दत्ता) पवार.!.YP
प्रदेश उपाध्यक्ष - राष्ट्रीय छावा संघटना, महाराष्ट्र.
माहिती अधिकार कार्यकर्ता, महाराष्ट्र राज्य.
0 Comments