माळीनगर फेस्टिव्हलचे राम सातपुते यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन
माळीनगर (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी माळीनगर साखर कारखान्याने मोठे योगदान दिले आहे. माळीनगर शुगर फॅक्टरी शेतकऱ्यांवर प्रेम करणारी संस्था आहे.माळीनगर साखर कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतला आहे.या कारखान्याचे सर्व प्रश्न,अडीअडचणी सोडविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने आपल्या पाठीमागे उभा असल्याचे मतं माजी आमदार राम सातपुते यांनी केले.विधानपरिषदेवर जाण्याचे संकेतही राम सातपुते यांनी यावेळी दिले.
दि. २ ते ५ डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या माळीनगर फेस्टिव्हलचे उदघाटन म.फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर या नामफलकाचे अनावरण आणि दीपप्रज्वलन करून माजी आ.राम सातपुते यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन व फेस्टिव्हल चे मुख्यसंयोजक राजेंद्र गिरमे,मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे,एक्झिक्युटिव्ह चेअरमन मोहन लांडे,होलटाईम डायरेक्टर परेश राऊत,ऍडीशनल होलटाईम डायरेक्टर गणेश इनामके,संचालक राहुल गिरमे,एज्युकेशन सोसायटीचे व्हा.चेअरमन नितीन इनामके,सेक्रेटरी अजय गिरमे,खजिनदार ज्योती लांडगे,संचालक पृथ्वीराज भोंगळे,दिलीप इनामके,शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे,संचालक जयवंत चौरे,मनीष रासकर,मल्टिस्टेटचे अध्यक्ष अमोल गिरमे,अमित टिळेकर,सोनू पराडे,प्राचार्य के.बी.बिराजदार, उपप्राचार्य रितेश पांढरे आदी उपस्थित होते.फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक राजेंद्र गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे व सहकारी संचालक यांनी फेस्टिव्हलचे उत्कृष्टपणे आयोजन केले आहे.
राम सातपुते म्हणाले की, माळशिरस तालुक्यात नामांकित असा भव्यदिव्य हा फेस्टिव्हल आहे.निवडणूक हरलो तरी आपण मला उद्घाटक म्हणून बोलावून सन्मान केला.माळीनगर साखर कारखाना ही शेतकऱ्यांवर प्रेम करणारी संस्था आहे.ती वाढली पाहिजे व टिकली पाहिजे.शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन करण्याचे काम या कारखान्याने केले आहे.ते आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे.राजेंद्र गिरमे यांनी कारखान्यासाठी एकतर्फी झुंज देऊन संघर्ष केला आहे.त्यामुळे खऱ्याअर्थाने तेच संघर्षयोद्धा आहेत.देवेंद्र फडणवीस व राजेंद्र गिरमे यांचे मी नुकतेच फोनवर बोलणे करून दिले आहे.या कारखान्यास व राजेंद्र गिरमे यांना ताकद द्यायची असल्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.पुढील वर्षी आमदार म्हणून फेस्टिव्हलच्या उदघाटनाला येईल,असे सांगून त्यांनी विधानपरिषदेवर जाण्याचे संकेत दिले.पुढीलवर्षी फेस्टिव्हलच्या उदघाटनास एखादा मंत्री आणू असेही त्यांनी सांगितले.राजेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.अजय गिरमे यांनी आभार मानले.
0 Comments