जिल्हा परिषदेत भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 6, 2024

जिल्हा परिषदेत भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन

 जिल्हा परिषदेत भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन

सोलापूर(कटूसत्यवृत्त):-जिल्हा परिषदेत भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करणेत आले. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर सर यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणेत आला. समाज कल्याण विभागाचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिरगणे, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, शिक्षणाधिकारी शेख, जिल्हा जलसंधारण अधिकारी पारसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, कास्ट्राईब संघटनेचे मार्गदर्शक अरूण क्षिरसागर, कक्ष अधिकारी गिरीष जाधव, कक्ष अधिकारीअविनाश गोडसे, कक्ष अधिकारी सचिन सोनकांबळे , कक्ष अधिकारी सचिन साळुंखे , कक्ष अधिकारी विवेक लिंगराज , प्रमुख उपस्थित होते. यानंतर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याच्या ठिकाणी सिईओ कोहिणकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून विभाग प्रमुखांसह अभिवादन केले. आरोग्य विभाग येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. अधिक्षक उत्कर्ष इंगळे यांचे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages