लाभ घेऊन निरोगी झाले तरच आरोग्य शिबीराचे सार्थक - डॉ. इनामदार
अकलुज(कटूसत्य वृत्त):- कोणत्याही आजाराचे निदान प्राथमिक अवस्थेत व्हायला हवे. लवकर निदान झाले तर त्याचा फायदा रुग्णांना होतो. त्यामुळे भविष्यातील पुढील संकट टाळले जावू शकते. त्यामुळे दरवर्षी आयेजीत करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबीराचा लाभ घेवुन रुग्ण बरे झाले तर मोफत आरोग्य शिबीरांचे सार्थक होईल असे मत अकलुज येथील सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत शंकरनगर, प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर व इंडियन मेडिकल असोशिएशन अकलुज यांचे संयुक्त विद्यमाने जयसिंह मोहिते- पाटील व मदनसिंह मोहिते-पाटील यांच्य अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त शंकरनगर येथील प्राथमिक केंद्रात आयोजीत करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराचे ऊद्घाटन कृषी ऊत्पन्न बाजार समिती अकलुजचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. इनामदार यांनी ऊपस्थितांना मार्गदर्शन केले.
सकाळी ९.३० वाजता आयोजीत करण्यात आलेल्या या शिबीरामध्ये, मोफत आरोग्य व रक्तदान शिबीर, महात्मा गांधी जन आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर सुरु असलेल्या या शिबीरामध्ये ३४५ नेत्र बिंदु तपासणी करण्यात येवुन त्यापैकी ४५ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंद करण्यात आली. तसेच रक्तदाब १५, कान, नाक, घसा-२५, स्त्रीरोग-६५, जनरल ८६, सी.बी.सी-३५, अस्थि-२५५, कपथेरपी २७५, ह्दयरोग, बी. पी. शुगर-५५ अशा एकुण ९४५ विविध रुग्णांची तपासणी करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.बी. अव्हाड यांनी दररोज ८० रुग्णांची तपासणी करण्यात येत असुन एप्रिल पासुन ८५०० रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे शासनाचा प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार अरोग्यकेंद्राने मिळविला असुन गरोदर माता व बालकांसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहीका ही शासनाच्या वतीने देण्यात आल्याचे आर्वजुन सांगितले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका शिंदे, सरपंच, वर्षा सरतापे, डॉ. नितीन एकतपुरे, डॉ. संतोष खडतरे, डॉ. संजय सिद, डॉ. कदम, डॉ. रावसाहेब गुळवे, डॉ. अभिजीत राजेभोसले, डॉ. सुरज महाडिक, डॉ. छाया दगडे, डॉ, काळे, डॉ. वाघमोडे, डॉ. नलवडे, डॉ. चंडगर, डॉ. थोरात, डॉ. रोहित देशमुख, ब्लड बँकेचे रक्त संकलन कर्मचारी,ग्रामविकास अधिकारी विजय नवले, सर्व ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी ऊपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल नष्टे यांनी केले.
0 Comments