Hot Posts

6/recent/ticker-posts

हिरपूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा असाही प्रताप घरकुल न बांधता अनुदान लाटले.....!

 हिरपूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा असाही प्रताप घरकुल न बांधता अनुदान लाटले.....!




चौकशी समितीच्या आगमनामुळे घरकुल बांधण्याची घाई


मूर्तिजापूर (कटूसत्य वृत्त):- अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत हिरपूर ग्रामपंचायत मध्ये घरकुल वाटपामध्ये  गरजू व पात्र लाभार्थ्यावर अन्याय करून बोगस कागदपत्राद्वारे सत्ताधाऱ्यांनी घरकुलाचा  स्वतः लाभ घेतल्याची तक्रार उपसरपंच  काजोल रवी कुमार शिंदे, रवींद्र गावंडे व गावकऱ्यांनी केल्यामुळे चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

 गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सामान्यपणे  जाती व समाजाच्या आधारवरच होतात.आपले कामे व्हावे याकरता जनता आपल्याच  समाजाचे प्रतिनिधी निवडून येण्याकरता निवडणुकीच्या काळात जीवाचे रान करतात. परंतु पदावर आरूढ झाल्यानंतर पदाधिकारी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्या ऐवजी स्वतःचे व आपल्या हितचिंतकाचे भले करण्याकडे लक्ष देतात. गावामध्ये  अनेक विधवा अपंग गरीब गरजू लोकांना राहण्यास साधे घर नसताना सुद्धा त्यांना वर्षानुवर्षे घरकुला पासून वंचित ठेवण्यात आले. दुसरीकडे आजी, माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी तीन-तीन घरकुलाचा लाभ घेतलेला आहे. तुमचे घरकुल मंजूर करून आणतो या नावाखाली अनेक गरजू भोळ्या भाबड्या लोकांकडून एजंटच्या माध्यमातून दहा हजार रुपये घेतल्याचा आरोप जनतेमधून होत आहे. हिरपूर ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी आपल्याच समाजातील विधवा व गरजवंतांना घरकुलाचा लाभ देण्याऐवजी स्वतःचे  सिमेंट काँक्रीटचे पक्के घर असताना, घरकुल न बांधता पूर्ण अनुदान प्राप्त केले आणि गरीब जनतेला मात्र बांधकामाच्या प्रत्येक  टप्प्यावर चेक काढण्याकरता पैशाची मागणी केल्या जाते. ‌ कुटुंबात राशन कार्ड एक असताना सुद्धा प्रत्येकाच्या नावाने घरकुल घेतलेले आहेत. अविवाहिताच्या नावाने सुद्धा घरकुल देण्यात आले आहे. तसेच मागील दहा वर्षात 35 घरकुलाचे बांधकाम न करताच शासकीय अनुदान लाटण्यात आले. एवढा मोठा भ्रष्टाचार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे  जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. घरकुल योजनेच्या निकषांमध्ये पात्र न ठरणाऱ्या अनेक लोकांना बोगस कागदपत्रे लावून घरकुलाचा लाभ मिळवून दिला. त्यामुळे गरजवंत लाभार्थ्यावर अन्याय झाला. यांचे एक टोळके असून यांनी गावातील शासनाच्या अनेक योजनेमध्ये हात धुवून घेतले. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला यांच्याकडे तक्रार केली म्हणून बोगस  घरकुल लाभार्थ्याची चौकशी करण्याकरता चौकशी समिती गठीत करण्यात आली चौकशी समितीच्या प्रमुख  किरण विंचुरकर सांख्यिकी अधिकारी व संदीप जामनिक ग्रामीण गृह अभियंता पाहणी करण्याकरता आले असता त्यांनी बोगस घरकुल लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. वंचित विधवा उषा कोराट व गाडबैल या  महिलांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. चौकशी समितीने सखोल चौकशी करून योग्य अहवाल द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली अन्यथा बचत गटाच्या माध्यमातून आंदोलन उभारण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला. घरकुल पासून वंचित असणारे मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments