द रोज क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने गुलाब प्रदर्शनाचे आयोजन
विविध रंगांची ५०० प्रकारचे गुलाब पाहायला मिळणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- द रोज क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने दि. २८ व २९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सोलापुरातील जुना वालचंद कॉलेज रोडवरील लोटस मल्टिपर्पज हॉल येथे ३६ वर्षानंतर गुलाब प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष ममता बोलाबत्तीन आणि सचिव सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या गुलाब प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत करण्यात येत आहे. आपल्या भारतामध्ये ८०० हून अधिक प्रकारचे गुलाब आढळतात.त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील हवामानात ५०० प्रकारच्या गुलाबासाठी पोषक वातावरण आहे.
या गुलाब प्रदर्शनात विविध जातींची व विविध रंगांची ५०० प्रकारचे गुलाब पाहायला मिळणार आहेत. यावेळी सोबतच गुलाब पुष्प, पुष्पगुच्छ, पुष्परचना व फुलांची रांगोळी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र आणि विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशी भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य आहे.परिसंवाद दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत याच ठिकाणी परिसंवाद आणि दि २९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
या प्रदर्शनासाठी आयोजन समितीचे दत्ता सुरवसे, मनोरमा बँक परिवाराचे श्रीकांत मोरे, लायन्स क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष दिनेश बिराजदार, लोटस मल्टिपर्पज हॉलच्या संचालिका संजीवनी देवसानी, पुष्पा गुंगे , रोज सोसायटी ऑफ पुणेचे अध्यक्ष गणेश शिर्के यांनी ५०० पॉट उपलब्ध करून दिले आहेत.
या पत्रकार परिषदेस वैशाली कुलकर्णी, शिरीष गोळवलकर, शांता येळबंकर आदी उपस्थिती होते.
0 Comments