19 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम गुरूवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली साजरा होणार आहे.
यावेळी ध्वजदिन -2023 निधी संकलनात उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालयांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. सदर कार्याक्रम महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम. राज कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास जिल्हयातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख, जिल्हयातील माजी सैनिक, सैनिक विधवा,वीरमाता पिता व वीरपत्नी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी केले आहे.
0 Comments