माढा मतदारसंघातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न
सोडवण्यासाठी मीनल साठे यांना निवडून द्या -दादासाहेब साठे
माढा (कटूसत्य वृत्त):- यंदाची निवडणूक आता पाणी किंवा उसावर नसून ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याची आहे. आपल्या देशात भाजप व राज्यात युतीचे सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला यांच्यासाठी कल्याणकारी योजना शासनाने आणलेल्या आहेत. अॅड. मीनल साठे यांच्या रूपाने महायुतीने एक उच्चशिक्षित, कायदेतज्ज्ञ असणारा उमेदवार दिलेला आहे. त्यांना विजयी करून महायुती सरकारच्या कारभारास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी अंजनगाव उमाटे येथील सभेत बोलताना केले.
माढा विधानसभा मतदार - संघातील महायुतीच्या उमेदवार अॅड. मीनल साठे यांच्या प्रचारार्थ अंजनगाव उमाटे येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी भाजपचे नेते जलतज्ज्ञ अनिल पाटील हे होते. ते पुढे म्हणाले, तालुक्यातील आमदारांनी गेल्या ३० वर्षांपासून सर्वसामान्य जनतेची मोठी फसवणूक केलेली आहे. गेल्या ३० वर्षांपासून सीना माढा बोगद्यातून नदीला पाणी सोडले. या एकमेव कामावरून ही नेते मंडळी मतदान घेत आहेत. खरंतर या सीना माढा बोगद्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युती सरकारच्या काळात झाले असून त्याचे श्रेय गेल्या पंचवीस वर्षांपासून बबनराव शिंदे हे घेत आहेत. आपण समोरचे उमेदवार पाहिले तर एक उमेदवार तर दहावी शिक्षण असलेला व दुसरा उमेदवार त्यांच्या संस्थेत बी. ए. पास झालेला आहे. तर मीनल साठे या उच्चशिक्षित व कायद्याचे शिक्षण घेतलेल्या आहेत. सहकारमहर्षी गणपतराव साठे, माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांचा राजकीय, सामाजिक वारसा लाभलेले नेतृत्व असून त्यांनी माढा नगरपंचायतच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास केलेला आहे.
दादासाहेब साठे म्हणाले, माढा मतदारसंघातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी व मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मीनल साठे यांना निवडून द्यावे. महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना सुरू ठेवण्यासाठी व महायुती सरकारचे हात भक्कम करण्यासाठी आम्ही मीनलताईच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहण्याचे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष मदन मुंगळे यांनी केले.
या सभेसाठी संत कूर्मदास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुधीर पाटील, कारखान्याचे संचालक राहुल पाटील, कारखान्याचे संचालक मधुकर चव्हाण, अंजनगाव उमाटेचे माजी उपसरपंच शिराज शेख, आढेगावचे उपसरपंच भाऊ वाघ, अंजनगाव चे विकास गोरे बिभीषण थोरे उपस्थित होते.
0 Comments