पर्यावरणीय दृष्टिकोनातून जपली जाणारी संस्कृती-वागदरीकर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गोधडी विणकाम कार्यशाळा:शाश्वत पर्यावरणीय दृष्टिकोनातून जपली जाणारी संस्कृती असून इंट्याक् सोलापूरचा; लोप पावत चाललेल्या व कलांचे जतन करण्याचा उपक्रम असल्याचं मत तज्ञ कलावती कलावती वागदरीकर यांनी व्यक्त केलं.
ग्रामीण भागातील महिलांच्या माध्यमातून पूर्वीच्या काळी काटकसरीने कामकाज पाहत असताना संसार चालवत असताना उरलेले वाया गेलेले कपड्यांच्या माध्यमातून एक उबदार शाल तथा चादर स्वरूपाची वीण घालून गोधडी या वस्त्र प्रकाराची निर्मिती केली जात होती. ती खऱ्या अर्थानं शाश्वत पर्यावरणीय संस्कृतीचा वारसा होय, असे प्रतिपादन गोधडी या वस्त्र प्रकाराचे पुण्यातील तज्ञ कलावती वागदरीकर यांनी केले.
INTACH सोलापूर विभागाने 26 नोव्हेंबर 2024 रोजी;लोप पावत चाललेल्या कलांचे जतन; उपक्रमांतर्गत एस इ एस चंडक कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, सम्राट चौक, येथे एक दिवसीय;गोधडी विणकाम कार्यशाळा; झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी
तज्ञ प्रशिक्षिका श्रीमती कलावती वागदरीकर, पुणे, INTACH समन्वयिका सिमंतिनी चाफळकर, सहसमन्वयिका श्वेता कोठावळे आणि पुष्पांजली काटीकर, श्रीमती रेवती डिंगरे, श्रीमती शीला पाटील यांच्या हस्ते रोपास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रथम तज्ञांनी गोधडी चा इतिहास, वेगवेगळ्या भागातील त्याचे स्वरूप व सध्या त्याचे विविध वस्तूंच्या स्वरूपापर्यंत आलेला प्रवास या सर्व मुद्द्यांवर दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक छोटा कापडाचा तुकडा रंगीबेरंगी कापडांच्या तुकड्याने गोधडी विणकामाच्या माध्यमातून पूर्ण केला. कार्यक्रमास लागणारे सर्व साहित्य संस्थेतर्फे पुरविण्यात आले होते. कार्यशाळेसाठी 15 शाळेतील 75 विद्यार्थी व 7 नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.
कार्यशाळेच्या समाप्ती कार्यक्रमात चंडक कॉलेजचे प्राचार्य आर्कि. पंकज उपाध्ये, INTACH सोलापूरचे नूतन समन्वयक डॉ.प्रा.नरेंद्र काटीकर यांच्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले.
श्रीमती रेवती डिंगरे, श्रीमती शीला पाटील, गीतांजली दिंडी, मोनिका टिमके, राखी खरबस, रोहिणी जोकारे व रंजना करंजकर यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली.
0 Comments