Hot Posts

6/recent/ticker-posts

मनोज जरांगेंची भूमिका राजकारणाची व्याख्या बदलवणारी-हेमंत पाटील

 मनोज जरांगेंची भूमिका राजकारणाची व्याख्या बदलवणारी-हेमंत पाटील
मराठा आरक्षण लढ्याला आणखी बळ मिळण्याची शक्यता


 

पुणे, ४ नोव्हेंबर २०२४

 

राज्यातील सामाजिक आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट राजकीय पक्षांसोबत दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची जरांगेची भूमिका राजकारणाची व्याख्या बदलवणारी आहे,असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.४) केला. जरांगेच्या भूमिकेला ओबीसी बांधवांचा सर्वच स्तरातून पाठिंबा राहील, असे देखील पाटील म्हणाले. 

 

जरांगेच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक आता निवडणुकीच्या रणधुमाळीत बघायला मिळणार असल्याने राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहे. विविध मतदार संघातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यापूर्वीच जरांगेंची भेट घेवून त्यांच्या सहकार्याचे साकडे घातले होते. जरांगे यांनी 'जिथं त्रास दिला आहे, त्यांना पाडून बदला घ्यायचा', अशी रोखठोक भूमिका मांडली. त्यामुळे त्यांच्या या राजकीय व्युहरचनेचा फटका कुठल्या राजकीय पक्षाला सर्वाधिक बसणार हे निकालानंतर स्पष्ट होईलच, असे पाटील म्हणाले.

 

या निवडणुकीत मराठा, ओबीसी, दलित आणि मुस्लिम  फॅक्टर महत्वाचे ठरणार आहे. ओबीसींनी आरक्षण विरोधी पक्षांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे.विद्यमान सरकारचे समर्थक असलेल्या उमेदवारांना त्यामुळे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील पाटील म्हणाले. लवकरच जरांगे यांची भेट घेणार असून त्यांच्या प्रचार दौर्यात सहभागी होणार असल्याचे पाटील म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments