Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रणिती, तू अमरच्या प्रचारात उतरलं पाहिजेस!

 प्रणिती, तू अमरच्या प्रचारात उतरलं पाहिजेस!




उद्धव ठाकरेंनी केली खा प्रणिती शिंदे यांना आघाडी धर्माची आठवण

'दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 'मी प्रणितीलासुद्धा सांगणार आहे, तू अमरच्या प्रचारात उतरलं पाहिजेस! मी स्वतः प्रणितीच्या प्रचारासाठी आलो होतो. सुशीलकुमारजी मला विनंती करण्यासाठी घरी आले होते, ते सेना प्रमुखांचे जुने मित्र ! त्यामुळे माझ्या उमेदवारांच्या सभा सोडून मी प्रणितीच्या प्रचारासाठी आलो होतो! तुझ्यासाठी माझ्या शिवसैनिकांनी मदत केली, आता तू अमरला मदत कर!' दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारासाठी रविवारी उद्धव ठाकरे यांची जुळे सोलापुरात जाहीर सभा झाली, यावेळी उद्धव ठाकरेंनी खासदार प्रणिती शिंदे यांना आघाडी धर्माची आठवण करुन दिली.

या जाहीर सभेत ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. माझ्या महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनो, अशी साद देताच सभास्थळ उद्धव साहेब ठाकरे आगे बढोच्या घोषणानी आसमान्त दुमदुमून गेले. व्यासपीठावर उमेदवार अमर रतीकांत पाटील, मिलिंद नार्वेकर, अनिल कोकीळ, रतिकांत पाटील, रवी पाटील, धवलसिंग मोहिते पाटील, महेश कोठे, शरद कोळी, अस्मिता गायकवाड, उत्तमप्रकाश खंदारे, गणेश वानकर, अजय दासरी, विष्णू कारमपुरी, भीमाशंकर मेत्रे, संतोष पाटील, बालाजी चौगुले, रवी कांबळे, अतुल भवर, दत्ता वानकर, लहू गायकवाड, प्रियाताई बसवंती, पूजा खंदारे आदी उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी एक वाक्य चांगले बोलले दाखवावे असे आव्हान पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. त्यांचा भाषण लिहून देणारा रजेवर असावा किंवा टेलिप्रोम्पटर बंद पडला असावा, अशी खिल्ली उडवत ठाकरे यांनी राहुल गांधी यांनी बाळासाहेबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले होते, याची आठवण करून दिली.

अमित शहा यांचा उल्लेख सर्किट असा करत ठाकरे म्हणाले, ३७० कलम रद्द करायला शिवसेनेचा पाठींबा होता. हे विसरत आहात. दहशतवाद काश्मीरात सुरु होता. हिंदू पंडिताची हत्या होत होती. त्यावेळी मोदी, शहा आणि त्यांचा भाजपा कोठे होता ? त्यावेळी या हिंदू पंडितांना शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रात आसारा आणि सुरक्षा पुरवली होती. आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता? असा सवाल ठाकरे यांनी केला.

महिलांना लाडकी बहीण योजना आणता, त्या दीड हजार रुपयात घर चालतं का? असा सवाल करत ठाकरे म्हणाले, बदलापूरला चिमुरडीवर आत्याचार करता तिच्या मात्या पित्यांना पोलीस ठाण्यात  अडवून ठेवता? त्याच आंदोलन झालं लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले त्यावेळी ही फिर्याद नोंदवली. पण चिमुरडिसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांना दोरखंडाने बांधून पोलीस ठाण्यात नेले. आणि तुम्ही महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी सांगता.
प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी यावं म्हणून सुशीलकुमार माझ्याकडे आले होते. माझ्या उमेदवाराचा प्रचार सोडून मी सोलापुरात सभा घेतली. आता आघाडी मजबूत करण्याची वेळ तुमची आहे. अमरने तुमच्यासाठी जीवाचे रान केलें आता तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा प्रणिती आज विदर्भात आहेत. त्या परत आल्यावर अमर पाटील यांच्यासाठी कार्यरत होतील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments