मराठा आंदोलक आक्रमक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची
गाड़ी अडवली..!
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुका भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथे प्रचारासाठी गेले असता सकल मराठा समाज क्रांतीमोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी गाड़ी आड़उन प्रचारासाठी गावात पाय ठेउ न देण्याची भूमिका घेतल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मराठा आंदोलकांची मनधरणी करण्यासाठी मोठी पराकाष्ठा करावी लागली.सरते शेवटी मराठा आंदोलकांनी आमदार कल्याणशेट्टी यांची सभा उधळून लावली.
0 Comments