माळशिरस विधानसभेसाठी अँड. नितीन भोसले यांच्या नावाची चर्चा...
नातेपुते, (कटूसत्य वृत्त):- माळशिरस विधानसभेची,सध्या जिल्ह्याभर चर्चा होत असून, अनेक मागासवर्गीय उमेदवार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत.तर काही . इतर जातीच्या धनदांडग्या लोकांनी मागासवर्गीय जातीचे बनावट, बोगस दाखले काढलेले आहेत अशी तालुक्यात चर्चा आहे. मात्र माळशिरस तालुक्यासाठी स्थानिक मागासवर्गीय ओरिजनल उमेदवाराची म्हणून एडवोकेट नितीन भोसले यांच्या नावाची चर्चा तालुक्यातून विविध गावातून युवकातून जोर धरताना दिसत आहे.
एडवोकेट नितीन भोसले हे स्वच्छ चारित्र्याचे, अभ्यासू लोकाभिमुख विधीज्ञ असून, माळशिरस बार असोसिएशन मध्ये, सन-२०२१ मध्ये ते सचिव पदी राहिलेले आहेत.
माळशिरस तालुक्यातून कोर्टाची कामे करून घेण्यासाठी येणाऱ्या, शोषित, पीडित, शेतकरी,कामगार,मजूर वर्गातील स्त्री - पुरुष नागरिकांची मोफत कामे करून देण्यात त्यांचा हातखंडा आहे.ते कधीही कुठल्याही गरजूला माघारी जाऊ देत नाहीत.त्यामुळेच,त्यांच्या नावाची चर्चा सर्वसामान्य जनतेतून, मतदारांचे सर्व स्तरातून होताना दिसत आहे. एडवोकेट नितीन भोसले हे सध्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या संपर्कात नाहीत मात्र जनतेच्या विश्वासावर अपक्ष म्हणून माळशिरस तालुक्यातून निवडणूक लढण्यात ते सकारात्मक असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले.

0 Comments