भंडारकवठे येथे लोकमंगल साखर कारखानाच्या वतीने शेतकरी पीक परिसंवाद मेळाव्याचे आयोजन...
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या वतीने रविवारी, सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेतकरी पीक परिसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शेतकरी, तज्ञ, आणि शेतीसंबंधित विविध क्षेत्रातील जाणकार व्यक्तींनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, पिकांचे संरक्षण, जमिनीची सुपीकता, कीड नियंत्रण, जलव्यवस्थापन आणि सेंद्रिय खतांचा वापर यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, उपस्थित तज्ञांनी शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित तंत्रज्ञान, जैविक शेतीच्या तंत्रांचा वापर, आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा याबद्दल चर्चा केली. शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या आणि त्यावर सल्ला मिळवला. लोकमंगल साखर कारखान्याने अशा प्रकारचे मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांच्या हितासाठी योगदान दिले आहे. या परिसंवादाचे प्रास्ताविक लोकमंगल कारखान्याचे संचालक पराग पाटील यांनी केले. याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकर्यांना लकी ड्राॅ द्वारे बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी ऊस पिकतज्ञ अंकुश चोरमुले, सेंद्रिय शेती तज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील, ऊसभुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सोमनाथ हुलगे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते

0 Comments