निर्मल हॉस्पिटल, मिरज येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा
या कार्यक्रमात माणिकराव सूर्यवंशी, मानसशास्त्र तज्ञ सांगली यांनी 'World Mental Health Day' या विषयावर मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच, डॉ. दिपक मुकादम तसेच डॉ. शीतल शिंदे यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले.
गि.ग.कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात रुग्णाच्या कायदेशीर अधिकारांच्या जागृतीवर भर दिला. तसेच, मानसिक आजारांबाबत जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशेषतः निर्मल हॉस्पिटल, मिरज सारख्या ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन करून मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागरूक करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात निर्मल हॉस्पिटलद्वारे व्यसने व मानसिक रोग यावर जनजागृतीपर नाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार नितिन आंबेकर, सहायक विधी सेवा प्राधिकरण यांनी मानले यावेळी निर्मल हॉस्पिटल स्टाफ आणि मातोश्री हिराई देशमुख नर्सिंग कॉलेज , रेड शिराळा चे विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments