Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय टपाल साप्ताहानिमित्त 'पोस्ट ऑफिस क्षेत्रभेटीचे' आयोजन

 राष्ट्रीय टपाल साप्ताहानिमित्त 'पोस्ट ऑफिस क्षेत्रभेटीचे' आयोजन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिनांक ९ ते १३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये 'राष्ट्रीय टपाल साप्ताहा'निमित्त शास्त्रीनगर परिसरातील श्री समर्थ विद्यामंदिरच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुनानकनगर पोस्ट ऑफिस येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले.

     यावेळी कार्यालयीन प्रमुख निलांबरी बेऊर यांनी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस च्या सर्व विभागांची माहिती करून दिली याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या कोणकोणत्या सुविधा सध्या उपलब्ध आहेत याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देऊन पत्रलेखनासाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. 

       यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना पोस्ट कार्ड, आंतर्देशीय पत्र व लिफाफे वाटप करण्यात आले. दिनांक ९ ते १३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये 'राष्ट्रीय टपाल साप्ताहा'निमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या प्रियजनांना पत्र लिहून शुभेच्छा देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी पोस्ट ऑफिसमधील परशुराम धुळे, निगाप्पा माळगोंडे, रामचंद्र ननवरे व लखन पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या क्षेत्रभेटीचे संपूर्ण नियोजन राजकिरण चव्हाण यांनी केले. 

       यावेळी मुख्याध्यापक मल्लिनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजुषा मुळे, श्रुती शिखरे, महादेव चौरे, दैवशाला उकिरडे यांचे सहकार्य लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments