Hot Posts

6/recent/ticker-posts

दक्षिणमधून शिवसेनेचे अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर

 दक्षिणमधून शिवसेनेचे अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठी राजकीय घडामोडी समोर आले आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे बोलले जात आहे अमर पाटील यांना पक्षाने ab फॉर्म दिल्याचा फोटोही व्हायरल होत आहे. अमर पाटील हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव आहेत तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहिले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर त्यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपली जोरदार मोर्चेबांधणी केली, त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी ही उमेदवारी मिळण्यासाठी जोर लावला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे जेव्हा सोलापूरला आले होते तेव्हाच त्यांनी घोषणा केली होती ती घोषणा खरी ठरली असून शेवटी अमर पाटील यांनी दक्षिणची उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले असल्याचे चित्र आहे.

मागील महिन्याभरापासून दक्षिण मध्ये तयारी केलेल्या सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी यांची मात्र चांगलाच निराशा होण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसचे नेते दिलीप माने यांनीही दक्षिणमधून तयारी केली होती आता काडादी यांच्यापेक्षा दिलीप माने हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments