Hot Posts

6/recent/ticker-posts

महासंघ जिल्हा संघटनेचे कमीशन व इंष्टाक वाढी बाबत प्रधान सचिव यांना निवेदन

 महासंघ जिल्हा संघटनेचे कमीशन व इंष्टाक वाढी बाबत प्रधान सचिव यांना निवेदन


अकलूज (कटूसत्य वृत्त):- अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा संघटने कडुन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांना सोलापूर ग्रामीण मधील इंष्टाक वाढ होऊन गरीब व गरजू रेशनकार्ड धारकांना अन्न धान्य मिळावे व धान्य दुकानदार यांचे मोफत धान्य वाटपाचे जून 2024 महिन्यापासूनचे थकीत कमीशन मिळावे तसेच नोव्हेंबर व डिसेंबर 2022 रोजी धान्य दुकानदार यांनी चलना पोटी भरलेली रक्कम मागील दोन वर्षांपासून थकीत आहे.तो भरणा माघारी मिळावा असे निवेदन संघटने कडुन देण्यात आले.तसेच या वेळी निवेदन सोबत ग्रामीण भागातील इंष्टाक वाढ व्हावी म्हणून माढा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे शिफारस पत्र प्रधान सचिव यांना देण्यात आले.प्रधान सचिव  रणजितसिंह देओल यांनी महासंघ जिल्हा संघटनेला दीपावली सणाच्या आदी कमीशन जमा करण्यात येईल व इंष्टाक बाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल तसेच धान्य दुकानदार यांनी भरणा केलेली रक्कम सुद्धा लवकरात लवकर आपणास मिळेल असे आश्वासन दिले.यावेळी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक, महासंघ जिल्हा संघटनेचे सहसचिव सोमनाथ पवार,सहकार महर्षी संघटनेचे सह सचिव अरूण जाधव,अक्षय मिले आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments